Most Wickets In Test Cricket: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 10 गोलंदाज, यादीत फक्त दोन भारतीय
पण तुम्हाला महित आहे का कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-10 गोलंदाजांच्या यादीत कोणाचा समावेश आहे?
मुंबई: सध्या कसोटी क्रिकेटचे वारे वाहू लागले आहे. 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करावा लागला. तसेच भारतीय संघ पुढील महिन्यापासुन बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. पण तुम्हाला महित आहे का कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-10 गोलंदाजांच्या यादीत (Most Wickets In Test Cricket) कोणाचा समावेश आहे?
यादीत फक्त 2 भारतीय गोलंदाज
तसेच या यादीत भारतातील किती गोलंदाजांचा समावेश आहे? वास्तविक, या यादीत 2 भारतीय गोलंदाजांची नावे आहेत. मात्र, आम्ही तुम्हाला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-10 गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत. (हे देखील वाचा: Most Catches in Test Cricket: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे टॉप 5 खेळाडू, भारतीय दिग्गजांच्या नावावर विश्वविक्रम)
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 10 गोलंदाज (Top 10 bowlers with Most Wickets in Test Cricket)
मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan)
या यादीत श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानावर आहे. मुथय्या मुरलीधरनच्या नावावर 133 कसोटी सामन्यांमध्ये 800 बळी आहेत. मुथय्या मुरलीधरन 1993 ते 2010 पर्यंत कसोटी फॉरमॅटमध्ये श्रीलंकेकडून खेळला.
शेन वॉर्न (Shane Warne)
ऑस्ट्रेलियाचा दिवंगत महान लेगस्पिनर शेन वॉर्न या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. शेन वॉर्नच्या नावावर 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट आहेत. शेन वॉर्न 1992 ते 2007 पर्यंत ऑस्ट्रेलियाकडून खेळला.
जिमी अँडरसन (Jimmy Anderson)
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जिमी अँडरसनने 188 कसोटी सामन्यात 704 विकेट घेतल्या आहेत. जिमी अँडरसन 2003 ते 2024 पर्यंत इंग्लंडकडून खेळला.
अनिल कुंबळे (Anil Kumble)
या यादीत भारतीय पहिले नाव अनिल कुंबळेचे आहे. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे चौथ्या क्रमांकावर आहे. अनिल कुंबळेच्या नावावर 132 कसोटी सामन्यांमध्ये 619 विकेट्स आहेत.
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad)
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड पाचव्या स्थानावर आहे. स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर 167 कसोटी सामन्यांमध्ये 604 विकेट आहेत.
ग्लेन मॅकग्राथ (Glenn McGrath)
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या नावावर 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेट आहेत. ग्लेन मॅकग्रा 1993 ते 2007 या कालावधीत ऑस्ट्रेलियाकडून कसोटी फॉर्मेटमध्ये खेळला.
नॅथन लायन (Nathan Lyon)
ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायनने 129 कसोटी सामन्यांमध्ये 530 विकेट्स घेतल्या आहेत. या गोलंदाजाने 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण केले होते.
कोर्टनी वॉल्श (Courtney Walsh)
वेस्ट इंडिजच्या धोकादायक गोलंदाजांपैकी एक असलेल्या कोर्टनी वॉल्शने 132 कसोटी सामन्यांमध्ये 519 फलंदाजांना आपले बळी बनवले. कर्टनी वॉल्श 1984 ते 2001 पर्यंत वेस्ट इंडिजकडून खेळला.
रवीचंद्रन अश्विन
भारताचा ऑफस्पिनर रवी अश्विनने 100 कसोटी सामन्यांमध्ये 516 विरोधी फलंदाजांना बाद केले आहे. रवी अश्विनने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रवी अश्विन नवव्या स्थानावर आहे.
डेल स्टेन (Dale Steyn)
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या नावावर 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 बळी आहेत. डेल स्टेन 2004 ते 2019 पर्यंत दक्षिण आफ्रिकेकडून खेळला.