IND vs ENG Head To Head: भारत आणि इंग्लड यांच्यात होणार चुरशीची लढत, कसा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड? घ्या जाणून
या स्पर्धेत इंग्लंडचा संघ कमकुवत दिसत असला तरी याला हलक्यात घेता येणार नाही, कारण हा संघ कधीही पलटवार करू शकतो.
2023च्या वर्ल्ड कपमध्ये (ICC Cricket World Cup 2023) टीम इंडिया विजयरथावर स्वार होत आहे. आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यांपैकी रोहित आणि कंपनीने सर्व सामने जिंकले आहेत. आता भारताचा पुढील सामना 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध (IND vs ENG) होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा संघ कमकुवत दिसत असला तरी याला हलक्यात घेता येणार नाही, कारण हा संघ कधीही पलटवार करू शकतो. तर या सामन्याआधी या दोघांमधील सामन्यांचे हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊया. (हे देखील वाचा: ICC World Cup 2023: मॅक्सवेलने ICC आणि BCCI वर केली टीका तर वॉर्नरने केला बचाव, दोन्ही कांगारू फलंदाज आमनेसामने)
कसा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड
एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यात 8 सामने झाले आहेत. भारताने यापैकी 3 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 4 विजय मिळवले आहेत आणि 1 सामना बरोबरीत राहिला आहे. त्याचबरोबर 2003 नंतर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध कधीही विजय मिळवलेला नाही. विश्वचषक 2007 आणि विश्वचषक 2015 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले नव्हते. त्याच वेळी, 2011 मध्ये सामना बरोबरीत राहिला आणि 2019 मध्ये इंग्लंडने भारताचा पराभव केला.
गेल्या विश्वचषकात भारताला मिळाला होता पराभव
खरे तर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ अतिशय खराब फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत झालेल्या 4 सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. अशा स्थितीत या संघाला उपांत्य फेरी गाठणेही कठीण दिसते आहे. पण, तुम्हाला आठवत असेल की वर्ल्ड कप 2019 मध्ये जेव्हा भारत आणि इंग्लंड साखळी सामन्यात आमनेसामने आले होते, तेव्हा टीम इंडियाला 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या स्पर्धेतही टीम इंडिया साखळी सामन्यांमध्ये विजयरथावर स्वार झाली होती आणि इंग्लंडविरुद्धचा एकमेव साखळी सामना हरला होता.