World Cup Qualifiers 2023: आजपासून सुरू होणार विश्वचषक पात्रता फेरीचा थरार, 2 जागांसाठी 10 संघ लढतील
यामध्ये झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, नेदरलँड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, अमेरिका आणि यूएई या संघांचा समावेश आहे. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.
भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (ODI World Cup 2023) 8 संघ थेट पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन स्पॉट्ससाठी 18 जूनपासून झिम्बाब्वेमध्ये विश्वचषक पात्रता (World Cup Qualifiers 2023) सामने होणार आहेत. यामध्ये एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. जे 2 स्पॉट्ससाठी एकमेकांच्या विरोधात जातील. भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित दोन स्थानांसाठी पात्रता फेरीच्या सामन्यांमध्ये 10 संघांमध्ये लढत होणार आहे. यामध्ये झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, नेदरलँड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, अमेरिका आणि यूएई या संघांचा समावेश आहे. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, नेदरलँड्स, नेपाळ आणि अमेरिका यांना ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. तर श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान आणि यूएई यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
'या' फॉर्मेट अंतर्गत सामने आयोजित केले जातील
ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघाला चार सामने खेळायला मिळणार आहेत. दोन्ही गटातील टॉप-3 संघ पुढील फेरीसाठी म्हणजेच सुपर-6 साठी पात्र ठरतील. सुपर-6 साठी पात्र ठरल्यानंतर संघांना अन्य गटातील तीन संघांशी खेळावे लागेल. जे दोन संघ सुपर-6 मध्ये टॉप-2 मध्ये असतील त्यांना 2023 च्या विश्वचषकाचे तिकीट मिळेल. याशिवाय विश्वचषक पात्रता फेरीचा अंतिम सामनाही दोन्ही संघांमध्ये 9 जुलै रोजी होणार आहे. (हे देखील वाचा: Nitin Menon On Team India: अंपायर नितीन मेनन यांचा मोठा खुलासा, 'भारताचे स्टार खेळाडू त्यांच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी दबाव आणतात')
भारतात कधी - कुठे पाहणार लाइव्ह
तुम्ही भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आयसीसी विश्वचषक पात्रता 2023 सामने थेट पाहू शकता. याशिवाय हे सामने तुमच्या मोबाइलवर डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीम केले जाऊ शकतात. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता होणार आहेत.