शिखर धवन याने दाखवली बॉडी बिल्डर स्टाईल, Biceps दाखवत शेअर केला 'हा' फोटो

शिखरने इन्स्टाग्रामवरचे बायसेप्स दाखवताना फोटो शेअर केला आहे. शिखरसह टीव्ही ऍक्टर करण वाही देखील त्याचे बायसेप्स दाखवतोय.

शिखर धवन, करण वाही (Photo Credit: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) मैदानावर जितका शानदार फलंदाजी करतो तितकाच मैदानाबाहेर तो सदैव आनंदी राहतो. शिखर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो आणि बऱ्याच वेळा त्याने त्याच्या वेगळ्या अंदाजानेचाहत्यांना आश्चर्यचकित करत राहतो. सध्या शिखर टीम इंडियासह बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध टी-20 सामन्यासाठी सज्ज होत आहे. शिखरने मागील काही वर्षात आपल्या फिटनेसवर बरेच काम केले आहे याची एक झलक त्याने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना दिली. शिखरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तो त्याचे बायसेप्स दाखवताना दिसत आहेत. शिखरसह टीव्ही ऍक्टर करण वाही (Karan Wahi) देखील त्याचे बायसेप्स दाखवतोय. (मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची मुलगी Samaira रंगली चेन्नई सुपर किंग्सच्या रंगात, पहा Photo)

फोटो शेअर करत, शिखरने कॅप्टनमध्ये 'पण, आधी फ्लेक्स करूया' असे लिहिले. दुसरीकडे, करणनेही सोशल मीडियावर फोटो शेअर केला आणि लिहिले की, "लहानपणापासून सोबत बॉडी बनवत आहोत." करण आणि शिखर बालपणीचे मित्र आहे. शिखरने शेअर केलेला फोटो त्याच्या फॅन्सना आवडलेला दिसला. पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

But first let's flex 💪🏼 😎 @karanwahi

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिखरने त्याचा बासुरी वाजवतानाचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आपले नवीन कौशल्य दाखवले. धवन मागील काही वेळापासून बासुरी वाजवण्यास शिकत आहे आणि वेळोवेळी आपल्या चाहत्यांसाठी व्हिडिओ शेअर करत राहतो. शिखर सध्या बांगलादेशच्या भारत दौऱ्यापूर्वी कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करत आहे. दोन्ही संघातील पहिला टी-20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाईल. टी -20 मालिकेसाठी कर्णधारपद धवनचा साथीदार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला देण्यात आला आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मालिकेचा पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून इंदोरमध्ये खेळला जाईल, तर मालिकेचा दुसरा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळला जाईल.