IND W vs AUS W, 18th Match Key Players: आज ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडिया उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा करेल प्रयत्न, सर्वांच्या नजरा असतील 'या' महान खेळाडूंवर
ॲलिसा हिली या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. आजचा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल.
India Women's National Cricket Team vs Australia Women's National Cricket Team 18th Match: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा 18 वा सामना (2024 ICC Women’s T20 World Cup) आज म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. ॲलिसा हिली या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. आजचा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल.
भारत दुसऱ्या स्थानावार
टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव करून न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाची भरपाई केली आहे. या मोठ्या विजयासह टीम इंडिया अ गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी खूप धावा केल्या असून अरुंधती रेड्डी, आशा शोभना यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. (हे देखील वाचा: IND-W vs AUS-W, Sharjah Weather Forecast & Pitch Report: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसामुळे व्यत्यत येणार? हवामान आणि खेळपट्टी कशी असेल? येथे जाणून घ्या)
ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला आहे. पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. ऍशले गार्डनरने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अत्यंत घातक गोलंदाजी केली असून कर्णधार ॲलिसा हिलीने 37 धावा केल्या आहेत. मेगा इव्हेंटमध्ये टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड चांगला आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाला मोठा फायदा झाला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 34 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने 25 वेळा विजय मिळवला आहे, तर भारताने केवळ आठ वेळा विजय मिळवला आहे. एक सामना निकालाविना संपला. टी-20 विश्वचषक स्पर्धेत गेल्या 5 वर्षात दोन्ही संघांमध्ये 19 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने 14 सामने जिंकले आहेत.
सर्वांच्या नजरा असतील या खेळाडूंवर
अरुंधती रेड्डी : टीम इंडियाची युवा स्टार गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. अरुंधती रेड्डीने मागच्या सामन्यातही आपल्या संघासाठी 3 बळी घेतले होते. आजच्या सामन्यातही अरुंधती रेड्डी प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडू शकते.
ऍशले गार्डनर : ऑस्ट्रेलियाची महान अष्टपैलू खेळाडू ऍशले गार्डनर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऍशले गार्डनरने या स्पर्धेत आतापर्यंत घातक कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध ऍशले गार्डनरने 4 षटकांत 21 धावा देत 4 बळी घेतले आहेत. ऍशले गार्डनर आजच्या सामन्यातही कहर करू शकतो.
स्मृती मानधना : टीम इंडियाची अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना आजच्या सामन्यात तिच्या बॅटने शानदार खेळी खेळू शकते. स्मृती मंधानाने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
टीम इंडिया : स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग ठाकूर, आशा शोभना.
ऑस्ट्रेलिया : ॲलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), बेथ मूनी, जॉर्जिया वेअरहॅम, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, ग्रेस हॅरिस, सोफी मोलिनक्स, मेगन शूट.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)