ICC Cricket World Cup 2019 साठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना (Photos)

आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ काल रात्री इंग्लंडला रवाना झाला.

Team India Jet set to ICC Cricket World Cup 2019 (Photo Credits: Twitter)

आयसीसी वनडे वर्ल्डकप (ICC Cricket World Cup)  स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ काल (मंगळवार, 21 मे) रात्री इंग्लंडला रवाना झाला. त्यावेळेसचे काही खास फोटोज बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोत कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या,लोकेश राहुल, केदार जाधव यांच्यासह इतर खेळाडू दिसत आहेत. 30 मे पासून वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होईल. लोरिन आणि रूडिमेंटल या बँडने साकारलेलं 'वर्ल्ड कप'चं खास एंथम साँग (Watch Video)

BCCI ट्विट:

वर्ल्डकपसाठी रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली याने कोच रवी शास्त्री यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून चाहत्यांचा दबाव सांभाळणे कठीण असल्याचे विराट कोहली याने सांगितले.

भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.  तर 14 जुलैला लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड कपमधील अंतिम सामना पार पडेल.