Team India Semi Final Qualification Scenario: पाकिस्तानवर विजय मिळवूनही टीम इंडियाचे सेमीफायनलमध्ये स्थान पक्के आहे का? संपूर्ण समीकरण जाणून घ्या
न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना 58 धावांनी गमावल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. या दणदणीत पराभवामुळे टीम इंडियाच्या नेट रनरेटचे बरेच नुकसान झाले आहे. पण पाकिस्तानवरचा विजय हा टीम इंडियासाठी मोठी उपलब्धी आहे. उपांत्य फेरीचा मार्ग अजूनही सोपा नाही. पण, टीम इंडिया आता चांगल्या स्थितीत आहे.
Team India Semi Final Qualification Scenario: 2024च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचे आठ सामने आत्तापर्यंत झाले आहेत. टी 20 विश्वचषकाचा नववा( ICC Womens T20 World Cup 2024) सामना आज होणार आहे. मात्र, यंदाच्या विश्वचषकात भारतीय महिला संघाची काशी परिस्थीती आहे त्यावर नजर टाकू. पाकिस्तान विरुद्ध सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने (India Women Cricket Team )पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने या स्पर्धेत पहिला विजय नोंदवला आहे. भारतीय महिलांनी पाकिस्तान महिलांना हरवले. (हेही वाचा: England Women vs South Africa Women T20 Head To Head Record: इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, कोण आहे तगडा संघ? हेड टू हेड आकडेवारी पहा)
न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना 58 धावांनी गमावल्यानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. विश्वचषकाच्या पहिल्याच खेळात पराभव झोळीत आल्याने क्रीकेट चाहत्यांमध्ये मोठी नाराजी होती. या पराभवामुळे टीम इंडियाच्या नेट रनरेटचे बरेच नुकसान झाले आहे. पण पाकिस्तानवरचा विजय ही टीम इंडियासाठी मोठी उपलब्धी आहे. मात्र, उपांत्य फेरीचा मार्ग अजूनही सोपा नाही. पण टीम इंडिया आता चांगल्या स्थितीत आहे.
टीम इंडियाची वाट खडतर
सेमीफायनलसाठी पात्र ठरण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित सामन्यांमध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवावा लागेल. यासोबतच टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर घसरलेल्या नेट रनरेटकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाला हरवणे टीम इंडियासाठी सोपे नसेल.
जर टीम इंडियाने आपले सर्व सामने जिंकले आणि टीम न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर टीम इंडिया आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतात. टीम इंडियाने श्रीलंकेला हरवल्यास आणखी एक विजय मिळेल, तर न्यूझीलंडला विजयासह धक्का बसेल.
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात चांगला रनरेट असणारा संघ पात्र ठरेल. त्याशिवाय, आगामी सामन्यांवरही काही पात्रता समीकरणेही अवलंबून असतील. ज्याचे चित्र जेव्हा सर्व संघ किमान तीन सामने खेळतील तेव्हा स्पष्ट होईल. टीम इंडिया आता आपला पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध बुधवारी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी दुबईत संध्याकाळी 7.30 वाजता खेळणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)