India vs New Zealand 1st Test 2024 Day 2 Preview: टीम इंडिया पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा पराभव करण्यासाठी सज्ज, दुस-या दिवसाची हवामान परिस्थिती, मिनी बॅटल आणि स्ट्रीमिंगसह सर्व माहिती घ्या जाणून

पुढील दोन सामन्यांमध्येही त्याचा सहभाग निश्चित नाही.

Photo Credit- X

India vs New Zealand 1st Test 2024 Day 2 Preview: 16 ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ अद्याप सुरू झालेला नाही. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम करत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा सामना होऊ शकला नाही. सकाळपासूनच पाऊस होता. त्यामुळे खेळपट्टीखराब झाली होती. परिणामी पंचांना खेळ रद्द करावा लागला होता. जाणून घेऊयात तेथील हवामान आणि खेळपट्टीची परिस्थीती. (हेही वाचा: IND vs NZ 1st Test Called Off on Day 1: भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात पावसाचा धुमाकूळ; पहिल्या दिवसाचा खेळ रद्द)

दुसऱ्या दिवसाचे हवामान

भारतीय हवामान विभागाने (IMD) बेंगळुरूमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उद्याही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा सामना होणार की नाही? हे येणारा काळच ठरवेल. उद्या नाणेफेक सकाळी साडेनऊ वाजता होईल. तर पहिला चेंडू 9.15 वाजता टाकला जाईल. खेळपट्टीवर कव्हर्स स्थापित केले आहेत. अशा परिस्थितीत, खेळपट्टीमध्ये ओलावा अपेक्षित आहे.

न्यूझीलंड विरुद्ध भारत हेड-टू-हेड रेकॉर्ड: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांनी एकमेकांविरुद्ध 62 कसोटी सामने खेळले आहेत. यात टीम इंडियाने 22 कसोटी सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंडने 13 सामने जिंकले आहेत. 27 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे पावसाचा व्यत्यय आल्याने या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये निकालाची अपेक्षा करू शकतो. भारतात न्यूझीलंडने केवळ दोन कसोटी सामने जिंकले आहेत. 36 वर्षांपूर्वी न्यूझीलंडचा संघ शेवटचा जिंकला होता. मायदेशात उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 36 पैकी 17 कसोटी भारताने जिंकल्या आहेत. तर 17 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.

प्रमुख खेळाडू: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा रवींद्र जडेजा, विराट कोहली, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, टॉम लॅथम, एजाझ पटेल, डेव्हन कॉनवे, हे असे काही खेळाडू आहेत ज्यांना सामना कसा बदलायचा हे माहित आहे.

सामना कधी आणि कुठे होणार आहे?

भारतीय संघ विरुद्ध न्यूझीलंड संघ यांच्यातील पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 09:30 वाजता खेळवला जात आहे. पावसामुळे पहिला दिवस रद्द झाला होता. सामन्याच्या दुसऱ्यादिवशीही पावसाचा अंदाज आहे.

सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग कसे पहाल?

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका 2024 चे प्रसारण हक्क स्पोर्ट्स 18 नेटवर्ककडे आहेत. जे स्पोर्ट्स 18 या टीव्ही चॅनेलवर इंग्रजीत आणि स्पोर्ट्स 18 3 आणि कलर्स सिनेप्लेक्स (हिंदी) वर थेट सामना पाहू शकतील. भारत विरुद्ध न्यूझीलंड त्यांच्यातील सामना अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर विनामूल्य थेट पाहू शकता.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टी.आय.