Hardik Pandya and Natasa Stankovic Blessed With a Baby Boy: हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनकोविच यांना पुत्ररत्न, मुलाचा पहिला फोटो शेअर करून दिली गुड न्यूज
हार्दिकच्या कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन झाल्यानंतर त्याच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन केले आहे. हार्दिकने मुलाचा एक फोटो शेअर केला आणि नवीन पाहुण्याच्या आगमनाची माहिती दिली.
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांची पत्नी नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. हार्दिकच्या कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन झाल्यानंतर त्याच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन केले आहे. हार्दिकने मुलाचा एक फोटो शेअर केला आणि नवीन पाहुण्याच्या आगमनाची माहिती दिली. हार्दिकने स्वत: मुलाचा हात धरल्याचा फोटो पोस्ट केला, मात्र बाळाचा चेहरा फोटोत दिसत नाही. डिलिव्हरीपूर्वी नताशा आणि हार्दिकचे एक फोटो सोशल मीडियावर आले होते, ज्यात दोघांनी प्रसूतीसाठी जाताना आपला फोटो शेअर केला होता. नताशाबरोबर फोटो शेअर करताना हार्दिकने "लवकरच येत आहे" असे कॅप्शनमध्ये लिहिले. या फोटोसह हार्दिकने चाहत्यांना हा इशारा दिला की लवकरच तो पहिल्या मुलाचा बाप होणार आहे आणि नताशादेखील या खास मुहूर्तावर उत्सुक आहे. हार्दिक आणि नताशा या दोघांनीही या वेळेचा खूप चांगला आनंद लुटला. दोघांचे रोमँटिक फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. (हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविचचे 'हे' रोमँटिक मॅटर्निटी फोटोशूट पाहून तुम्हीही पडाल त्यांच्या प्रेमात, पाहा Photos)
हार्दिकने सर्वांना चकित करत 31 मे रोजी नताशा प्रेग्नन्ट असल्याचं जाहीर केलं. लॉकडाऊन दरम्यान दोघांनी लग्न केले आणि ही बातमी त्याच्या चाहत्यांसाठी आश्चर्यचकित करणारी ठरली. 1 जानेवार रोजी हार्दिकने नताशाशी गुपचूप साखरपुडा करुन सर्वांना चकित केले होते. या दोघांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ आणि फोटोंबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. दोघांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने गुड न्यूज शेअर करत सर्वांना साखरपुड्याची माहिती देत आश्चर्याचा धक्का दिला होता.
View this post on Instagram
We are blessed with our baby boy ❤️🙏🏾
A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on
हार्दिक आणि नताशाने 31 मे रोजी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली होती. “हार्दिक आणि मी आतापर्यंत एकत्र एक अविस्मरणीय प्रवास शेअर केला आहे, तो आता अधिक चांगला होणार आहे. एकत्रित, आम्ही लवकरच आपल्या जीवनात नवीन जीवनाचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत. आम्ही एकत्र आमच्या आयुष्याच्या या नवीन चरणासाठी उत्सुक आहोत आणि नम्रपणे आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यावा,” नताशाने इन्स्टाग्रामवर लिहिले होते. हार्दिकने देखील तेच फोटो त्याच्या इंस्टाग्राम पेजवर पुन्हा पोस्ट केले होते.