MS Dhoni Meets Joginder Sharma: T20 विश्वचषक विजेता संघातील सहकारी आणि पोलिस अधिकारी जोगिंदर शर्मा यांची एमएस धोनी यांना भेट (Watch Video)
या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
MS Dhoni Meets Joginder Sharma: विश्वचषक 2007 चे विजेते, माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि पोलिस अधिकारी जोगिंदर शर्मा यांनी एमएस धोनी (MS Dhoni ) यांची भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोगिंदर शर्मा हे हरियाणात डीसीपी (पोलिस उपायुक्त) आहेत. 2007 च्या T20 विश्वचषक फायनलनंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. जोगिंदरने भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक 2007 च्या फायनल दरम्यान शेवटचे षटक टाकले आणि भारतीय संघाला सामना जिंकण्यात मदत केली. (हेही वाचा- क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनी कसा कमावतो करोडो रुपये, 'नेट वर्थ' पाहून बसेल धक्का!)