T Natarajan Injury Update: टी नटराजन याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया; वैद्यकीय कर्मचारी, बीसीसीआय आणि चाहत्यांचे मानले आभार

त्याने आपल्या ट्विटर हँडलवर फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

T Natarajan Undergoes Knee Surgery (Photo Credit: Twitter)

दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या हंगामातून बाहेर गेलेल्या वेगवान गोलंदाज टी नटराजन (T Natarajan) याच्या गुडघ्यावर आज (27 एप्रिल) शस्त्रक्रिया (Knee Surgery) झाली आहे. त्याने आपल्या ट्विटर हँडलवर फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्याने वैद्यकीय कर्मचारी, बीसीसीआय आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. नटराजन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य होता. या हंगामात त्याने केवळ चारच सामने खेळले आहेत. यावर्षीच्या सुरूवातीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान नटराजनला ही दुखापत झाली होती.

नुकताच टी नटराजन यांनी ट्विटर हॅंडवरून एक फोटो शेअर केला होता. तसेच या फोटोला कॅप्शन देत को म्हणाला की, 'आज माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. दरम्यान, मी वैद्यकीय कर्मचारी सर्जन, डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. तसेच बीसीसीआय आणि मला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, असे नटराजन म्हणाला आहे. हे देखील वाचा- भारतीय विमानांवर बंदी घातल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना BCCI चा दिलासा! मायदेशी सुखरुप पोहचवण्याची घेतली जबाबदारी

ट्वीट-

बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून नटराजन याच्या पोस्टला रीट्वीट केले आणि त्याला त्वरित पुनर्प्राप्तीची शुभेच्छा दिल्या आहेत. नटराजनच्या अनुपस्थितीत हैदराबादची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. हैदराबादला 5 सामन्यांत केवळ एक विजय मिळवता आला आहे. शेवटच्या सामन्यात डेव्हिड कॅपिटलस विरूद्ध डेव्हिड वॉर्नरच्या संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.