Syed Mushtaq Ali T20 Trophy: आयपीएल ऑरेंज कॅप विजेता करणार महाराष्ट्राचे नेतृत्व, 4 नोव्हेंबरपासून सुरु होणार देशांतर्गत हंगाम; पहा संपूर्ण संघ

महाराष्ट्राचा एलिट गट अ मध्ये समावेश करण्यात आला आहे आणि त्यांचे लीग स्टेजचे सामने लखनौमध्ये खेळले जातील. सलामीच्या सामन्यात त्यांचा सामना तामिळनाडूविरुद्ध होईल.

रुतुराज गायकवाड (Photo Credit: PTI)

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सलामीवीर आणि आयपीएल (IPL) 2021 ऑरेंज कॅप विजेता रुतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) मध्ये महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा (Maharashtra) एलिट गट अ मध्ये समावेश करण्यात आला आहे आणि त्यांचे लीग स्टेजचे सामने लखनौमध्ये खेळले जातील. सलामीच्या सामन्यात त्यांचा सामना तामिळनाडूविरुद्ध होईल. 4 नोव्हेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होईल. चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएलच्या विजयी मोहिमेत सर्वाधिक धावा करणारा गायकवाडला कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार राहुल त्रिपाठी मेगा फायनलदरम्यान त्याच्या मांडीच्या दुखापतीतून बरा होण्यात अपयशी ठरल्याने नौशाद शेख (Naushad Sheikh) उपकर्णधार म्हणून साथ देईल. केदार जाधव (Kedar Jadhav) हा लाइनअपमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याच्याकडून मधल्या षटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची अपेक्षा असेल. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: मनीष पांडे कर्नाटक संघाचा कर्णधार, IPL च्या युवा स्टारचा देखील 20 सदस्यीय संघात समावेश)

महाराष्ट्राच्या गोलंदाजी आक्रमणात उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज प्रदीप दधे, डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि स्लो डाव्या हाताचा ऑर्थोडॉक्स गोलंदाज सत्यजीत बच्छाव यांचा समावेश आहे, जो बॅटने देखील संघाची मदत करू शकतो. आक्रमक सलामीवीर यश नहारचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय राहुल त्रिपाठी, सिद्धेश वीर आणि राजवर्धन हंगरगेकर यांच्या जागी स्वप्नी गुगळे, पवन शहा आणि जगदीश झोपे यांची निवड करण्यात आली आहे. सिद्धेश वीरचे मधले बोट फ्रॅक्चर झाले आणि राजवर्धन हंगरगेकर यांची अंडर-19 चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र सय्यद मुश्तक अली टी-20 चषक संघ: रुतुराज गायकवाड (कॅप्टन), नौशाद शेख (उपकर्णधार), केदार जाधव, यश नहार, अजीम काझी, रणजीत निकम, सत्यजीत बच्छाव, तरनजित सिंह ढिल्लन, मुकेश चौधरी, आशय पालकर, मनोज इंगळे, प्रदीप दधे, शाम काझी, काझी स्वप्नील फुलपगार, दिव्यांग हिंगणेकर, सुनील यादव, धनराज सिंह परदेशी, स्वप्नील गुगळे, पवन शहा, जगदीश झोपे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif