SRH Vs MI, IPL 2020: सनरायझर्स हैदराबाद संघाने टॉस जिंकला; मुंबई इंडियन्स करणार प्रथम फलंदाजी

मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात हैदराबाजच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 56वा सामना शारजाह स्टेडियमवर खेळला जात आहे.

SRH Vs MI, IPL 2020: सनरायझर्स हैदराबाद संघाने टॉस जिंकला; मुंबई इंडियन्स करणार प्रथम फलंदाजी
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात हैदराबाजच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 56वा सामना शारजाह स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने प्ले-ऑफच्या फेरीत प्रवेश केला असून आजचा सामना हैदराबादच्या संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान, हैदराबादच्या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नर करत आहे. तर, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळत आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- SRH Vs MI, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

सनरायझर्स हैदराबाद:

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बेसिल थंपी, यरा पृथ्वीराज, बिली स्टॅनलेक, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल , खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृध्दिमान साहा, अब्दुल समद, फॅबियन अलन, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, संदीप बावनका, संजय यादव, विराट सिंग.

मुंबई इंडियन्स:

रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, क्रिस लिन, मिशेल मॅकक्लेनाघन, नॅथन कूटर-नाईल, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, मोहसिन खान, शेरफेन रदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय.

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2020 07:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).