विराट कोहली याला झटका, ICC Test क्रमवारीत स्टीव्ह स्मिथ याने मिळवले अव्वल स्थान
आयसीसीच्या जाहीर झालेल्या नवीन टेस्ट क्रमवारीत स्मिथ आता नंबर वन टेस्ट फलंदाज बनला आहे. मागील एक वर्षापासून कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेलय कोहलीला मोठा झटका बसला आहे. अॅशेसमधील जबरदस्त कामगिरीबद्दल स्मिथला बक्षीस मिळाले.
एका वर्षाच्या बंदीनंतर पहिली कसोटी मालिका खेळत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडून राजवट काढून घेतली आहे. आयसीसीच्या जाहीर झालेल्या नवीन टेस्ट क्रमवारीत स्मिथ आता नंबर वन टेस्ट फलंदाज बनला आहे. याचबरोबर कोहलीची दुसर्या स्थानावर घसरला झाली आहे. मागील एक वर्षापासून कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेलय कोहलीला मोठा झटका बसला आहे. अॅशेस (Ashes) मधील जबरदस्त कामगिरीबद्दल स्मिथला बक्षीस मिळाले. सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या टेस्ट मालिकेत दोन शतक आणि अर्धशतक झळकावत शानदार फलंदाजी केली. पहिल्या कसोटी सामन्यात 144 आणि 142 धावा काढून एक वर्षाच्या बंदीनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. (IND vs WI 2nd Test: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकत विराट कोहली झाला एमएस धोनी पेक्षा वरचढ, वाचा सविस्तर)
भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) मधील टेस्ट मालिका संपल्यानंतर मंगळवारी आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आणि यात स्मिथने 904 गुणांसह अव्वल स्थान गाठले. कोहली पहिल्या स्थानावरून दुसर्या स्थानावर गेला आहे. विराट कोहलीचे सध्या 903 गुण आहेत. विंडीजविरुद्ध दुसऱ्या डावांत खराब प्रदर्शनाचा कोहलीला फटका बसला. दुसरीकडे स्मिथ दुखापतीमुळे अॅशेस मालिकेचा तिसरा सामना खेळू शकला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनानंतर स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या अॅशेसच्या पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक ठोकला, तर दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दुखापत झाल्यावरदेखील त्याने 92 धावा केल्या. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन विराटच्या पाठोपाठ 878 गुणांसह तिसर्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या रँकिंगबद्दल बोलले तर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स याने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहेत. तर, विंडीजविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराह याने चार स्थानांची झेप घेत तिसरे स्थान मिळवले आहेत. नुकत्याच संपुष्टात आलेल्या विंडीज टेस्ट मालिकेत बुमराहने प्रभावी खेळी केली. यात १ हॅट-ट्रिकचा देखील समावेश आहे.