Sri Lanka vs New Zealand 3rd ODI Toss Update: नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय; श्रीलंकेच्या गोलंदाजांना दाखवावी लागणार चांगली कामगिरी
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय; श्रीलंकेच्या गोलंदाजांना दाखवावी लागणार चांगली कामगिरी
Sri Lanka vs New Zealand 3rd ODI Toss Update: श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड (Sri Lanka vs New Zealand) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी अडीच वाजल्यापासून खेळवला जाईल. मात्र,त्या आधी दोन्ही टीमचा टॉस झाला. टॉस न्यूझीलंडने जिंकला. न्यूझीलंड टीमने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांना दाखवावी लागणार चांगली कामगिरी करावी लागणार.
दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेच्या संघानं न्यूझीलंडचा तीन गडी राखून पराभव केला. यासह श्रीलंकेनं मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत श्रीलंकेची कमान चरित असालंकाच्या हाती आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचं नेतृत्व मिचेल सँटनर करत आहे.यासह श्रीलंकेने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. (Sri Lanka vs New Zealand 3rd ODI 2024 Live Streaming: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा क्लीन स्वीप करण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न, भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?)
दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 45.1 षटकांत केवळ 209 धावा करु शकला. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमननं सर्वाधिक 76 धावांची खेळी खेळली. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 47 षटकांत 210 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघानं 46 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठलं. श्रीलंकेसाठी स्टार यष्टिरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसनं नाबाद 72 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज 19 नोव्हेंबर रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ या आधी अर्धा तास असेल.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना कुठे पहायचा?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना भारतात सोनी स्पोर्ट्स टेन 5 आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5 एचडी टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल. याशिवाय या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲप आणि फॅनकोड ॲपवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून तिसऱ्या वनडे सामन्याचा आनंद घेता येईल.
प्लेइंग इलेव्हन
श्रीलंका: पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, महिष टेकशाना, जेफ्री वांडरसे, दिलशान मदुशंका, असिथा फर्नांडो.
न्यूझीलंड: विल यंग, टिम रॉबिन्सन, हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मिचेल हे (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, ईश सोधी, जेकब डफी.