Sri Lanka vs New Zealand 1st T20I 2024 Pitch Report And Weather Update: आज श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार रोमांचक सामना, जाणून घ्या दंबुलाच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज डंबुला येथे खेळवला जाणार आहे. रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त ठरते.

Sri Lanka vs New Zealand 1st T20I 2024 Pitch Report And Weather Update:  आज श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार रोमांचक सामना, जाणून घ्या दंबुलाच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती
SL vs NZ (Photo: @BLACKCAPS)

Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st T20 2024:   श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 Series) पहिला सामना आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला  (Dambulla) येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rangiri Dambulla International Stadium)  7 सायंकाळी  वाजल्यापासून खेळवला जाईल. T20 विश्वचषकापासून श्रीलंका घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करत आहे. श्रीलंकेने नुकतीच टी-20 मालिका आणि एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव केला. अशा परिस्थितीत श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा न्यूझीलंडला तगडे आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघ भारताला कसोटी मालिकेत 3-0 ने पराभूत करून या मालिकेत प्रवेश करेल. श्रीलंकेला घरच्या मैदानावर पराभूत करणे किवी संघासाठी इतके सोपे नसेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक मालिका पाहायला मिळणार आहे.  (हेही वाचा  -  Sri Lanka vs New Zealand 1st T20I 2024 Live Streaming: श्रीलंका-न्यूझीलंड संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने-सामने; लाइव्ह टेलिकास्ट कुठे पहाल? )

पथुम निसांका, कुसल मेंडिस आणि कुसल परेरा हे फलंदाजीतील प्रमुख फलंदाज असतील. पथुम निसांकाने नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये 291 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंड आपला नवा कर्णधार मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली या मालिकेत खेळत आहे. संघाला तब्बल पाच महिन्यांनंतर टी-20 सामन्यांमध्ये परतावे लागणार आहे. फलंदाजीत ग्लेन फिलिप्स, डीन फॉक्सक्रॉफ्ट आणि मार्क चॅपमन हे संघाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.

खेळपट्टी अहवाल (SL vs NZ Pitch Report)

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज डंबुला येथे खेळवला जाणार आहे. रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त ठरते. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या १७६ धावांच्या आसपास आहे. हे मैदान सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. जसजसा सामना पुढे जाईल तसतशी फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पहिल्या डावात सरासरी 176 धावा असू शकतात. डंबुलाची खेळपट्टी पाठलाग करण्यास सोपी मानली जाते, त्यामुळे दोन्ही कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणे पसंत करतात.

हवामान अहवाल (Weather Report)

डंबुलातील सामन्यादरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळात व्यत्यय येऊ शकतो. हवामान उष्ण आणि दमट असेल, त्यामुळे खेळाडूंना थकवा सहन करावा लागू शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2024 05:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).