WTC Points Table 2023-25: न्यूझीलंडला हरवून श्रीलंकाची तिसऱ्या स्थानी मोठी झेप, ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटा; भारत अव्वल स्थानी विराजमान

तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या खात्यात 62.50 टक्के गुण आहेत.

SL vs NZ (Photo Credit - X)

SL vs NZ 2nd Test 2024: श्रीलंकेने गॅले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा एक डाव आणि 154 धावांनी पराभव (SL Beat NZ) करून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत श्रीलंकाने आपले स्थान मजबूत केले आहे. त्यामुळे आता पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघासाठी धोका निर्माण झाला आहे. न्यूझीलंडवरच्या या शानदार विजयानंतर श्रीलंकेचे 55.55 टक्के गुण झाले आहेत आणि ते WTC गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या खात्यात 62.50 टक्के गुण आहेत. आता ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील फरक केवळ 6.95 टक्के गुणांचा आहे.

न्यूझीलंड सातव्या क्रमांकावर 

न्यूझीलंडबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटी हरल्यानंतर संघ चौथ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरला आहे. आता न्यूझीलंडच्या खात्यात केवळ 37.50 टक्के गुण शिल्लक आहेत. या पराभवामुळे डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याच्या या चॅम्पियन संघाच्या आशांनाही मोठा धक्का बसला आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test Day 3 Stumps: कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय, ओल्या मैदानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द; चाहत्यांची निराशा)

भारत अव्वल स्थानी विराजमान

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया WTC पॉइंट टेबलमध्ये सर्वाधिक 71.67 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारताचा कसोटी सामना सध्या कानपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध सुरू आहे. पावसामुळे हा सामना अनिर्णित राहू शकतो. अशा स्थितीत टीम इंडियाला काही नुकसान सहन करावे लागू शकते.

कशी झाली गॉल टेस्ट?

गॉल कसोटीत न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेविरुद्ध असहाय्य दिसत होता. यजमान संघाने प्रथम फलंदाजी करताना 601 धावांवर डाव घोषित केला. यानंतर श्रीलंकेने न्यूझीलंडला पहिल्या डावात 88 आणि दुसऱ्या डावात 360 धावांत गुंडाळले. या मालिकेत श्रीलंकेने पाहुण्यांचा 2-0 असा व्हाईटवॉश केला.