South Africa vs India, 2nd T20I Match Live Playing XI Update: दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया दुसऱ्या T20 सामन्यात या दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात उतरत आहेत, दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या रोमांचक सामन्यात दोन्ही संघ या महान खेळाडूंसोबत मैदानात उतरले आहेत.

South Africa vs India, 2nd T20I Match Live Playing XI Update: दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया दुसऱ्या T20 सामन्यात या दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात उतरत आहेत, दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
IND vs SA (Photo Credit - X)

South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team, 2nd T20I Live Playing XI Update:  दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. उभय संघांमधला पहिला सामना गकेबरहा (Gqeberha )  येथील सेंट जॉर्ज पार्कवर (St George's Park)  खेळवला जात आहे. पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 61 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा (Bangladesh)  पराभव करून दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेत प्रवेश करणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या (Aiden Markram) खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव  (Suryakumar Yadav) करत आहे. दरम्यान, दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या रोमांचक सामन्यात दोन्ही संघ या महान खेळाडूंसोबत मैदानात उतरले आहेत.  (हेही वाचा  -South Africa vs India, 2nd T20I Match Live Toss Update: दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय)

पाहा पोस्ट -

दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॉन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.

टीम इंडिया : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.

 

(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2024 07:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).