Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुलीची दुस-यांदा होणार अँजिओप्लास्टी, दोन स्टेंट लावण्यात आल्या
रिपोर्टनुसार, सौरव गांगुली याच्यावर दुस-यांदा अँजिओप्लास्टी होणार आहे अशी माहिती त्याच्या डॉक्टरांनी दिली आहे. त्याचबरोबर दोन स्टेंट देखील टाकण्यात आल्या आहेत.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ही बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. अलीकडेच त्याला हृदयविकाराचा झटका आला असताना त्याची तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावर मात करून त्याला घरी देखील सोडण्यात आले होते. मात्र आता पुन्हा त्याची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, सौरव गांगुली याच्यावर दुस-यांदा अँजिओप्लास्टी (Angioplasty) होणार आहे अशी माहिती त्याच्या डॉक्टरांनी दिली आहे. त्याचबरोबर दोन स्टेंट देखील टाकण्यात आल्या आहेत.
रिपोर्टनुसार, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ देवी शेट्टी यांनी गांगुलीच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर अॅंजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की, 48 वर्षीय माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नसांमध्ये ब्लॉकेज आल्यामुळं दोन स्टेंट टाकण्यात आले आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, संपूर्ण चाचण्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.हेदेखील वाचा- Sourav Ganguly Health Update: BCCI प्रमुख सौरव गांगुली यांची वैद्यकीय चाचणी सुरु, अहवालानंतर आणखी एक Stent बसवणार होणार निर्णय
Sourav Ganguly undergoes second round of angioplasty, two stents inserted
Read @ANI Story | https://t.co/Fj4FGoUAeH pic.twitter.com/LhFtZFaEV6
— ANI Digital (@ani_digital) January 28, 2021
सौरव गांगुली आपल्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, सौरव गांगुली रुग्णालयात पोहोचताच पुन्हा एकदा त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं गेलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या गांगुलीने 113 टेस्ट आणि 311 वनडे सामने खेळले. गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 21 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड व ऑस्ट्रेलिया येथे दोन दशकांहून अधिक काळानंतर कसोटी सामना जिंकला आहे. गांगुलीच्याच नेतृत्वात संघाने पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा टेस्ट सिरीज जिंकली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2021 09:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

