Sourav Ganguly: इंग्लंड दौऱ्यासाठी Shreyas Iyer ला वगळल्याबद्दल सौरव गांगुली संतापला; निवडकर्त्यांना फटकारले
इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरला वगळ्याबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआयवर संताप व्यक्त केला आहे.
Sourav Ganguly: आयपीएल 2024 मध्ये केकेआरला चॅम्पियन बनवले. भारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या. आयपीएल 2025 मध्येही टीमला फायनलपर्यंत नेले. तरीही इंग्लंड(England vs India) दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) स्थान न दिल्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) निवडकर्त्यांना फटकारले आहे. सौरव गांगुलीने रेव्हस्पोर्ट्सशी बोलताना अय्यरला दुर्लक्षित केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
सौरव गांगुली म्हणाला की, "श्रेयस अय्यर गेल्या एका वर्षात जबरदस्त क्रिकेट खेळत आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडसाठी निवडलेल्या संघात असायला हवा होता. गेल्या एक वर्ष त्याच्यासाठी चांगले राहिले आहे. अय्यरसारख्या क्षमतेच्या खेळाडूला वगळता कामा नये. त्यांनी आयपीएलमध्ये मोठ्या दबावाखाली चांगल्या धावा काढल्या. त्याशिवाय, जबाबदारीही घेतली आहे. यासोबतच तो शॉर्ट बॉलही चांगले खेळत आहे. जरी कसोटी क्रिकेट वेगळे असले तरी मला त्याला या मालिकेत खेळताना पहायचे होते."
पुढे संघातील इतर खेळाडूंशी बोलताना सौरव गांगुली म्हणाले की जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड ठरेल. "जसप्रीत बुमराह तुमचा सर्वात मोठा ट्रम्प कार्ड असेल. पण तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुम्ही त्याला सतत गोलंदाजी करायला लावू शकत नाही. शुभमन गिलला याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला विकेट घेण्यासाठी बुमराहचा वापर करावा लागेल. तुम्ही त्याला एका दिवसात 12 पेक्षा जास्त षटके गोलंदाजी करायला लावू नये. इतर गोलंदाजांना पुढे येऊ द्या. जर तुम्ही बुमराहला रोखण्यात आणि विकेट घेणारा गोलंदाज म्हणून वापरण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला जिंकण्याची चांगली शक्यता असेल."
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)