Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुली ‘Clinically Fit’; 7 जानेवारीला मिळणार डिस्चार्ज
अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly)याची प्रकृती आता ठीक आहे. कोलकत्ता येथील Woodlands Hospital ने दिलेल्या माहिती नुसार, सौरव गांगुली आता क्लिनिकली फीट (Clinically Fit) आहे. मात्र त्यांना अजून एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागत असल्याने उद्या म्हणजे (7 जानेवारी) ला डिस्चार्ज दिला जाणार आहे. सुरूवातीच्या काही रिपोर्ट्सनुसार सौरवला आज (6 जानेवारी) हॉस्पिटलमधून सुट्टी मिळणार होती. 2 जानेवारीला माईल्ड कार्डिएक अरेस्टचा झटका आल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी आता पुढे ढकलण्यात आली आहे. Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांकडून बाळगली जातेय सावधगिरी.
9 जणांच्या तज्ञ डॉक्टरांच्या कमिटीकडून 48 वर्षीय सौरव गांगुली यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असल्याने त्यांच्यावर होणारी अॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली आहे. सौरवची कोविड टेस्ट देखील निगेटिव्ह आली आहे.
ANI Tweet
दरम्यान सौरव गांगुली Woodlands Hospital मध्ये दाखल झाल्यापासून अनुराग ठाकूर, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी त्यांच्या परिवाराची रूग्णालयात भेट घेऊन सौरव गांगुलीच्या प्रकृतीची चौकशी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोनवरून चौकशी केली होती. सोबतच क्रिकेटर्स आणि त्याच्या चाहत्यांनी देखील प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली होती.