SL vs BAN 2nd Test 2025 Live Streaming: श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना, कुठे पाहू शकता लाईव्ह सामना?

पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, त्यामुळे दोन्ही संघांना हा सामना जिंकून 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत महत्त्वाचे गुण मिळवायचे आहेत. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश दिला जाईल.

SL vs BAN 2nd Test 2025 Live Streaming: श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना, कुठे पाहू शकता लाईव्ह सामना?
PC-X

Sri Lanka national Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN 2nd Test 2025) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना 25 जून 2025 पासून कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (एसएससी) मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, त्यामुळे दोन्ही संघांना हा सामना जिंकून 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत महत्त्वाचे गुण मिळवायचे आहेत. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश दिला जाईल.

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील सामना किती वाजता सुरु होणार?

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 सायकलचा दुसरा कसोटी सामना 25 जून (बुधवार) पासून कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब येथे सकाळी 10.00 वाजता IST वाजता खेळला जाईल. तर टाॅस अर्धातास आधी होईल.

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील लाईव्ह सामना कुठे पाहणार?

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर केले जाईल, जिथे प्रेक्षक तो हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये पाहू शकतील. या रोमांचक सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाइन प्लॅटफॉर्म सोनीलिव्ह आणि फॅनकोड अॅप/वेबसाइटवर उपलब्ध असेल. क्रिकेट चाहते त्यांच्या मोबाइल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवरील या अॅप्सद्वारे कुठूनही या कसोटी सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

श्रीलंका संघ

धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पाथुम निसांका, ओशादा फर्नांडो, लाहिरू उदारा, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस, कामिंदू मेंडिस, पासिंदू सुरियाबंदरा, सोनल दिनुषा, पवन रत्नायके, प्रभात जयसूर्या, अकरा, रमेश राणाके, प्रभात जयसूर्या, थारिंदू रत्नायके. असिथा फर्नांडो, कसून रजिथा, इसिथा विजयसुंदर.

बांगलादेश संघ

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहेदी हसन मिराझ (उपकर्णधार), लिटन दास (यष्टीरक्षक), मोहिदुल इस्लाम (विकेटकीपर), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), झाकीर अली, खालेद अहमद, अनामूल हक, इबादत हुसेन, हसन महमूद, हसन मुरझा, हसन मुरझा, मुशफिकुर रहिम, हसन मोहम्मद. तैजुल इस्लाम.

(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2025 09:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).