Shubman Gill Injury Update: शुभमनच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, टीम इंडियासाठी गुड न्युज

शुभमन गिल दुखापतीमुळे मैदानाबाहेर जात आहे. मात्र आता त्याच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. एका रिपोर्टनुसार शुभमनच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालेले नाही.

Shubman Gill (Photo Credit - X)

Australia National Cricket Team vs India National Cricket Team, Border-Gavaskar Trophy:   22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला (Test Series)  सुरुवात होत आहे. टीम इंडियाने (Team India) 2017 पासून बॉर्डर-गावस्कर यांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. ही परंपरा त्यांना पुढे चालू ठेवायची आहे. ऑस्ट्रेलियात  (Australia) होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत स्थान निश्चित करायचे आहे. मागच्या वेळी टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना गाब्बामध्ये शानदार विजय मिळवला होता. ऋषभ पंत  (Rishabh Pant)  भारताचा स्टार फलंदाज म्हणून उदयास आला होता.  (हेही वाचा  -  AUS vs IND, Border Gavaskar Trophy 2024: कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार नाही, हे मोठे कारण आले समोर)

पर्थ कसोटीपूर्वी आली आहे. शुभमन गिल दुखापतीमुळे मैदानाबाहेर जात आहे. मात्र आता त्याच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. एका रिपोर्टनुसार शुभमनच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालेले नाही. त्याला दुखापत झाली आहे आणि तो लवकरच बरा होऊ शकतो. गिल दुखापतीमुळे सराव करत नाहीये. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे.

वास्तविक, गिल यांच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याची बातमी आली होती. सरावादरम्यान त्याला दुखापत झाली. पण रेव्हस्पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, गिलच्या अंगठ्याला पंक्चर झालेले नाही आणि तो लवकरच मैदानात परतू शकतो. पण यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागेल. गिलची दुखापत आठवडा किंवा दहा दिवसांत बरी होऊ शकते. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. बीसीसीआयने गिलच्या दुखापतीबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif