Video: शिखर धवनने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याचे केले आवाहन, मुलगा Zoravar सोबतचा मजेदार व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू फुटेल

त्याने कोरोना व्हायरलबद्दलही एक संदेश शेअर केला आहे जो आताची नाजूक स्थिती सांगण्याबरोबरच अत्यंत भावनाप्रधान आहे.

शिखर धवन आणि मुलगा जोरावर (Photo Credit: Instagram)

घातक कोरोना व्हायरसचा परिणाम जगावर होत असून खेळ जगावरही याचा परिणाम झाला आहे. बहुतेक क्रिकेट मालिका आणि स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे क्रिकेटपटू कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत. दरम्यान भारतीय स्टार सलामीवीर शिखर धवननेही (Shikhar Dhawan) इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो आपला मुलगा जोरावरबरोबर (Zoravar) मस्ती करताना दिसत आहे. धवन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो आणि आपल्या क्रिकेट चाहत्यांसाठी व्हिडिओज शेअर करत असतो. पुन्हा एकदा त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे आणि कोरोना व्हायरलबद्दलही त्याने एक संदेश शेअर केला आहे जो आताची नाजूक स्थिती सांगण्याबरोबरच अत्यंत भावनाप्रधान आहे. (Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसशी लढण्याची 'टेस्ट क्रिकेट' पद्धत... सचिन तेंडुलकर ने सांगितलं साथीच्या रोगाला पराभूत करण्याचे टिप्स)

या व्हिडिओत धवन आपल्या मुलासह लहान मूल बनताना दिसत आहे. त्याने यासोबत एक संदेशही लिहिला आहे. धवनने लिहिलेला संदेशही अत्यंत भावनाप्रधान असून तो सत्य प्रतिबिंबित करतो. त्याने लिहिले, "परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरून न जाणे, काळजी घेणे आणि आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवणे, आनंद पसरवणे आणि सकारात्मक असणे. आत्ता आपल्या सर्व प्रियजनांना हीच गरज आहे." शिखर आणि त्याच्या मुलाचा व्हिडिओ इतका मजेदार आहे की तुम्हालाही हसू फुटेल.

 

View this post on Instagram

 

Situation is quite tense out there but at the same time it's important to not panic, take precautions and spend some time with you family and spread happiness and positivity, that is what all your loved ones need right now 🙏🏻

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

कोरोना व्हायरसमुळे भारतातील अनेक लोक त्रस्त आहेत आणि आतापर्यंत दीडशेहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. क्रिकेट विश्वातील मोठ्या सेलिब्रिटी सोशल मीडियावर लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. धवनपूर्वी सचिन तेंडुलकर आणि आर अश्विन यांनीही लोकांना कोरोना विषाणूपासून सावध रहा आणि स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन केले होते. कोरोनापासून कसा बचाव करायचा हे सांगण्यासाठी सचिनने एक व्हिडिओ शेअर केला. माजी भारतीय सलामी फलंदाज फलंदाज सेहवागनेही या घातक विषाणूपासून बचाव करण्याचा संदेश दिला.