Sex Scandal मध्ये 'या' 5 दिग्गज खेळाडूंवर महिलांनी केले होते गंभीर आरोप; क्रिकेट करीअर आले होते धोक्यात

क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक महान खेळाडू आहेत ज्यांनी मैदानावर केलेल्या कामगिरीने चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. तसेच काही क्रिकेटपटू असेही होते ज्यांनी मैदानावर तर खूप नाव कमावले पण मैदानाबाहेरील गैरवर्तणूकीमुळे खलनायक बनले. गेल्या काही वर्षात दिग्गज क्रिकेटपटूंवर महिलांनी सेक्स सकॅण्डल अंतर्गत धक्कादायक आरोप केले होते.

इमाम-उल-हक (Photo by Laurence Griffiths/Getty Images)

Cricketers Who Were Involved In Sex Scandals: क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक महान खेळाडू आहेत ज्यांनी मैदानावर केलेल्या कामगिरीने चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. तसेच काही क्रिकेटपटू (Cricket) असेही होते ज्यांनी मैदानावर तर खूप नाव कमावले पण मैदानाबाहेर आपली काही चुकीच्या अँटिक्समुळे क्रिकेटपटू खलनायक बनले. होय, सेक्स सकॅण्डल (Sex Scandal) किंवा लैंगिक गैरव्यवहाराचा डाग काही खेळाडूंच्या आयुष्यात लागला की ते धुणे आजही त्यांना शक्य झालेले नाही. इतकंच नाही तर तर प्रकरणामुळे त्यांचे क्रिकेट करिअर देखील धोक्यात आले होते. क्रिकेटपटू माध्यमांकडे दुर्लक्ष करतात आणि सावधगिरी बाळगतात, पण गेल्या काही वर्षात दिग्गज क्रिकेटपटूंवर महिलांनी सेक्स सकॅण्डल अंतर्गत धक्कादायक आरोप केले होते. (Cricketers and Coach Controversies: या भारतीय 3 महान क्रिकेटपटू-प्रशिक्षकाच्या जोडीतील वाद बनले आकर्षणाचे केंद्र, आजची आहे खेळ चाहत्यांच्या आठवणीत)

शेन वॉर्न (Shane Warne)

शेन वॉर्न मैदानात स्पिनचा राजा होता पण मैदानाबाहेर, ऑस्ट्रेलियन महान गोलंदाज लैंगिक घोटाळ्यांचा राजा होता आणि बर्‍याच अनैतिक कृत्यांमध्ये त्याचा सहभाग होता. वॉर्नने डोना राईट नावाच्या ब्रिटीश परिचारिकेचा छळ केला; वॉर्नने डोना राईट नावाच्या ब्रिटीश परिचारिकेचा लैंगिक छळ केला. या घटनेचे काही फोटो देखील व्हायरल झाले होते. 2006 मधील काउंटी चॅम्पियनशिप खेळापूर्वी दोन मॉडेलशी शारीरिक संबंध होते; मेलबर्न स्ट्रीपर बरोबर एन्जॉय करताना आढळला; अनेक विवाहबाह्य संबंध; 2011 आयपीएल सामन्यादरम्यान त्याची तत्कालीन मैत्रीण एलिझाबेथ हर्लीला स्टेडियममध्ये उघडपणे किस करणे. अशा धक्कादायक आरोपांमुळे वॉर्नर नेहमीच चर्चेत राहिला.

क्रिस गेल (Chris Gayle)

लैंगिक घोटाळ्यांत वॉर्नला आव्हान देणारा कोणताही क्रिकेटपटू जवळ आला तर तो इतर कोणीही नाही तर युनिव्हर्स बॉस, क्रिस गेल आहे. जमैकन आपले आयुष्य भव्यपणे जगतो आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर स्त्री उपस्थितीत असतात. 2012 आयसीसी वर्ल्ड टी-20 दरम्यान, श्रीलंकेच्या हॉटेल रूममध्ये तीन ब्रिटिश महिलांनी जमैकन फलंदाजावर सेक्स करण्याचा आरोप केला होता.

शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi)

या यादीत पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचेही नाव आहे. सन 2000 मध्ये सिंगापूर येथे एका स्पर्धेदरम्यान आफ्रिदी हॉटेलच्या खोलीत काही मुलींसोबत आपत्तीजनक स्थितीत आढळला होता. त्यावेळी आफ्रिदीबद्दल मीडियामध्ये बरीच चर्चा रंगली होती. इतकंच नव्हे तर या प्रकरणानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आफ्रिदीवर कारवाई करत त्याच्यावर काही सामन्यांसाठी बंदी घातली होती.

केविन पीटरसन (Kevin Pietersen)

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनचा लैंगिक गैरव्यवहारात समावेश आहे. 2005 मध्ये Playboy मॉडेलने पीटरसनवर लैंगिक व्यसनाचा गंभीर आरोप केला होता.

माईक गॅटिंग (Mike Gatting)

ट्रेंट ब्रिज येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा आणखी एक दिग्गज खेळाडू माइक गॅटिंगवर त्याच्या हॉटेलच्या रूममध्ये एका बारगर्ल बरोबर सेक्स करण्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. फलंदाजाने हे आरोप नाकारले असले तरी इंग्लिश बोर्डाने त्यांना संघातून बाहेर केले.

याशिवाय, पाकिस्तानचा रायझिंग स्टार इमाम-उल-हक देखील काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर अनेक अश्लील चॅट आणि फोटो लीक झाल्यानंतर संकटात सापडला होता. इमामवर एकापेक्षा जास्त अफेर आणि गर्लफ्रेंड्सना फसविण्याचा आरोप करण्यात आला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now