MS Dhoni's Daughter Ziva Gets Rape Threats: एमएस धोनीच्या रांची फार्महाऊसच्या सुरक्षेत वाढ, माथेफिरूच्या धमकीनंतर पोलिसांची कारवाई

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चेन्नईच्या पराभवानंतर धोनी आणि पत्नी साक्षीच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवर कथित धमकी दिली गेली होती.

एमएस, झिवा आणि साक्षी धोनी (Photo Credit: Instagram)

MS Dhoni's Daughter Ziva Gets Rape Threats: आयपीएल (IPL) फ्रेन्चाझी चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनीची (MS Dhoni) 5 वर्षीय मुलीगी झिवाला (Ziva Dhoni) सोशल मीडिया ट्रोलवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर रांची (Ranchi) येथील भारतीय संघाच्या माजी कर्णधाराच्या फार्महाऊसवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. बुधवारी अबू धाबी येथे दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) चेन्नईच्या 10 धावांनी पराभवानंतर धोनी आणि त्याची पत्नी साक्षीच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवर कथित धमकी दिली गेली होती. 'न्यू इंडियन एक्सप्रेस'च्या अहवालानुसार, या विषयाची दखल घेत रांची पोलिस सावध झाले आहेत आणि धोनीच्या फार्महाऊसवर सुरक्षा वाढवली आहे, जिथे खेळाडूची पत्नी व मुलगी सध्या राहत आहेत, तर माजी भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020आवृत्तीसाठी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे आहे. (MS Dhoni's Daughter Ziva Gets Threats: CSKच्या पराभवानंतर एमएस धोनीच्या 5 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करण्याची धमकी, इरफान पठाणने दिले सडेतोड उत्तर)

अनेक मीडिया पोर्टलवरील अहवालानुसार सिमल्या भागात गस्तीत वाढ करण्यासोबत संशयास्पद घटकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी सिव्हील परिधानात काही पोलिस कर्मचारीही धोनीच्या फार्महाऊसच्या बाहेर तैनात केले गेले आहेत. दरम्यान, झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनचे (जेएससीए) उपाध्यक्ष अजय नाथ शहादेव यांनी या संपूर्ण प्रकरणास दुर्दैवी म्हटले आहे आणि ज्याने कोणी केले असेल त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. “क्रिकेटकडे केवळ करमणूक करण्याचे माध्यम म्हणून पाहिले गेले पाहिजे, परंतु इतरांनी नम्रता पणाला लावत लोक यापलीकडे जात आहेत. हे खरोखर दुर्दैवी आहे,” अजय म्हणाले.

दुसरीकडे, झिवाला बलात्काराच्या धमक्यांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला आणि समाजातील सर्व घटकांनी अशा प्रकारच्या वर्तनाचा निषेध केला. आपल्या आवडत्या टीमच्या पराभवानंतर खेळाडूंवर निराशा व्यक्त करण्याच्या घटना काही नवीन नाही. खेळाडूंच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे तर त्यांचे पुतळे आणि पोस्टर्सही जाळण्यात आले आहेत. तथापि, एखाद्या खेळाडूच्या मुलीला टार्गेट करण्याची घटना यापूर्वी कधीही न ऐकलेली आहे. दुसरीकडे, सीएसके सध्या सात सामन्यांपैकी फक्त दोन विजयांसह आयपीएल गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.