Sakshi Singh Birthday Celebration पार्टीत हार्दिक पांड्याने खास अंदाजात गायलं 'चन्ना मेरेया' (Video)

धोनी, झिवा यांच्यासह साऱ्यानीच या पार्टीमध्ये धमालमस्ती केली.

साक्षी सिंग बर्थ डे सेलिब्रेशन Photo credits : Instagram

भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीची पत्नी साक्षी सिंगचा (Sakshi Singh) आज (19 नोव्हेंबर ) 30 वाढदिवस आहे. मुंबईत काही जवळच्या मित्र मंडळींसोबत साक्षीच्या बर्थ डेचं सेलिब्रेशन झालं. दरम्यान या सेलिब्रेशनमध्ये गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) सोबत क्रिकेटर हार्दिक पांड्यादेखील (hardik Pandya) गाणं गाताना दिसला. काही सेलिब्रेटी आणि खेळाडूंसोबत साक्षीची बर्थ डे पार्टी रंगली त्यामधील हार्दिक पांड्याचा हटके अंदाज सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.

राहुल वैद्य सोबत चन्ना मेरेया (Channa Mereya) गाणं गाताना हार्दिक पंड्याने कानावर गुलाब ठेवलं होतं. राहुल, हार्दिक आणि साक्षीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. यासोबतच सोफियादेखील पार्टीमध्ये सहभागी झाली होती. हार्दिक पांड्याने ट्विटरवर महेंद्र सिंग धोनी सोबतचा एक फोटो शेअर करताना असा Forever loveमेसेज लिहला आहे.

 

strong>चन्ना मेरेया गाणं गाताना हार्दिक पांड्या

 

View this post on Instagram

 

Channa mereya 😍❤️ V.c-@msdhoni.addicted

A post shared by M.S Dhoni⏺️ (@ms.mahi7781) on

सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दुखापत असल्याने हार्दिक पांड्या संघाचा भाग नाही तर धोनीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आराम दिला आहे. त्यामुळे यंदा मुंबईत साक्षीच्या बर्थ डेचं खास आयोजन करण्यात आलं. धोनी, झिवा यांच्यासह साऱ्यानीच या पार्टीमध्ये धमालमस्ती केली.