सचिन तेंडुलकरचा सर्वोत्तम डाव: जेव्हा मास्टर ब्लास्टरने आपला आवडता शॉट न खेळता केल्या 241 धावा, त्याची शिस्त बनली सर्वांसाठी धडा
आजच्या युवा खेळाडूंना त्याच्या त्या डावातून बरंच काही शिकता येईल. 2003-04 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सचिन दुहेरी शतकाचा एका शानदार डाव खेळला होता. या डावापूर्वी सचिनने तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांमध्ये 16.40 च्या सरासरीने केवळ 82 धावा केल्या होत्या.
भारताचा (India) महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने 2004 मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 241 धावांचा शानदार डाव खेळला होता. क्रिकेट विश्वात 'देव' म्हणून ओळखल्या जाणार्या सचिनने अनेक विक्रमांची नोंद केली आहे, परंतु कसोटी क्रिकेटमधील त्याच्या सर्वोत्तम खेळीबद्दल बोलायचे झाले तर आजच्या युवा खेळाडूंना त्याच्या त्या डावातून बरंच काही शिकता येईल. 2003-04 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सचिन दुहेरी शतकाचा एका शानदार डाव खेळला होता. या डावापूर्वी सचिनने तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांमध्ये 16.40 च्या सरासरीने केवळ 82 धावा केल्या होत्या. या खेळीत सचिनने ऑफ स्टंपच्या बाहेर शॉट न घेण्याचा निर्णय घेतला होता आणि 241 मधील केवळ 188 धावा त्याने लेग साइडमध्ये शॉट मारून केल्या. शिवाय, त्याने या क्षेत्रात 33 पैकी 28 चौकार ठोकले. ऑस्ट्रेलियन संघाने सचिनविरुद्ध या मालिकेत चेंडूला ऑफ साइडमध्ये ठेवण्याची योजना केली होती, जे सुरुवातीच्या सामन्यांमध्येही त्यांच्यासाठी प्रभावी ठरली. सचिन कांगारूंच्या जाळ्यात अडकला, म्हणून सचिन शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी सिडनीला पोचला तेव्हा त्याची रणनीती स्पष्ट होती की, तो ऑफ साईडवरून चेंडू खेळू खेळणार नाही. (लॉकडाउनमध्ये सचिन तेंडुलकरने केलेल्या हेयरकट वर इंग्लंडची महिला क्रिकेटर Danielle Wyatt ने अर्जुन बाबत केली मजेदार कमेंट)
या मालिकेच्या शेवटच्या सामन्याच्या दुसर्या डावात सचिनने ऑफ-साइडचे चेंडू सोडण्याची योजना आखली आणि शिस्तपूर्ण त्याचा पालन केला. परिणामी या सामन्यात तेंडुलकरने 10 तासांहून अधिक फलंदाजी केली आणि 436 चेंडूंचा सामना करत 241 धावांचे शानदार द्विशतक झळकावले.
दरम्यान, सचिनने भारताकडून 200 कसोटी सामन्यांच्या 329 डावात 15,921 धावा केल्या आहेत. यामध्ये 51 शतकं आणि 68 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमधील सचिनची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीनाबाद 248 धावा आहे. टेस्ट क्रिकेटव्यतिरिक्त सचिनने 463 एकदिवसीय सामन्यांच्या 452 डावांमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सचिनची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 200 धावा आहे.