सारा आणि अर्जुन सह योगासनं करुन सचिन तेंडुलकर याने साजरा केला Fathers Day 2020!
आपल्या मुलांसोबत योगासने करुन सचिनने यंदाचा फादर्स डे साजरा केला.
आज 21 जून रोजी जागतिक योग दिन (International Yoga Day) आणि पितृदिन (Fathers Day) जगभरात साजरा केला जात आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेकजण योगदिन आणि पितृदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या कठीण काळात 6 वा योगदिन घरीच योगा करुन साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यामुळे 'घरी योगा आणि कुटूंबासह योगा' (Yoga at Home & Yoga With Family) या थीमवर यंदाचा योगदिन साजरा झाला. योगदिन आणि पितृदिन हा योग जुळून आल्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने अनोखे सेलिब्रेशन केले आहे. (पितृदिन 2020 निमित्त 'Thank You For Everything' म्हणत सचिन तेंडुलकर याची बाबांसाठी खास पोस्ट)
सारा आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या सोबत योगासने करुन सचिनने आजचा फादर्स डे सेलिब्रेट केला आहे. त्याचबरोबर योगदिनाचे महत्त्व देखील राखले गेले आहे. वृक्षासन करतानाचा सारा, अर्जुन सोबतचा फोटो सचिनने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सचिनने लिहिले, "एकत्र योगासने करुन फादर्स डे चे सेलिब्रेशन."
Sachin Tendulkar Tweet:
सचिन तेंडुलकर याने फादर्स डे निमित्त वडिलांसोबतचा फोटो शेअर करुन खास पोस्ट केली आहे. त्याचबरोबर योगदिन आणि पितृदिन असा एकत्रितपणे आपल्या मुलांसोबत साजरा केला आहे. सचिनच्या या अनोख्या युक्तीमुळे दोन्ही दिवसांचं महत्त्व अधोरेखितं तर झालंच. पण हटके सेलिब्रेशनही झालं.