County Championship 2025: कसोटी संघात स्थान मिळाले नाही तरी Ruturaj Gaikwad इंग्लंडमध्ये खेळणार; काउंटी चॅम्पियनशिपसाठी Yorkshire कडून करारबद्ध

भारतीय कसोटी संघात स्थान न मिळालेला ऋतुराज गायकवाड जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे. यॉर्कशायरकडून एकदिवसीय कपसह काउंटी चॅम्पियनशिप देखील खेळेल.

County Championship 2025: कसोटी संघात स्थान मिळाले नाही तरी Ruturaj Gaikwad इंग्लंडमध्ये खेळणार; काउंटी चॅम्पियनशिपसाठी Yorkshire कडून करारबद्ध

Ruturaj Gaikwad in County Championship: देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात (India National Cricket Team) स्थान मिळाले नाही. मात्र, त्याने इंग्लंडला जाण्याची तयारी केली आहे. भारतीय संघ 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू करणार आहे. तर, 22 जुलैपासून ऋतुराज गायकवाड इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसेल. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये संपूर्ण हंगामासाठी त्याला यॉर्कशायरने (Yorkshire) करारबद्ध केले आहे. आयपीएल 2025 च्या मध्यात दुखापतीमुळे ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) माघार घेतली. त्यानंतर संघ केवळ प्लेऑफच्या शर्यतीतूनच बाहेर पडला नाही तर पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहिला. इंग्लंड दौऱ्यावर त्याच्या देशांतर्गत कामगिरीचा विचार करता कसोटी संघात त्याची निवड होण्याची अपेक्षा होती, परंतु त्याची निवड झाली नाही.

गायकवाड यॉर्कशायरकडून खेळेल

स्टार खेळाडूला इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. 10 जून 2025 रोजी यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने जाहीर केले की 28 वर्षीय भारतीय सलामीवीराला 2025 च्या हंगामासाठी परदेशी खेळाडू म्हणून करारबद्ध करण्यात आले आहे. गायकवाड 22 जुलै ते हंगामाच्या अखेरीपर्यंत यॉर्कशायरकडून काउंटी चॅम्पियनशिप आणि मेट्रो बँक वन-डे कपमध्ये खेळेल.

ऋतुराज गायकवाडने त्याच्या चमकदार देशांतर्गत आणि आयपीएल कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने 2016-17 रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 41.77 आहे. ज्यामध्ये सात शतके आहेत. तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 56.15 आणि 16 शतके त्याची क्षमता दाखवतात. 2021 मध्ये, गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जसाठी 635 धावा करून जेतेपद जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या नेतृत्वाखालीच भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 5132 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).