CSK vs RR : राजस्थानचा आयपीयलमधला शेवट गोड; चेन्नईवर 6 विकेट्सने विजय
राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला 6 विकेट्सने हरवले. राजस्थानच्या या विजयात वैभव सूर्यवंशी मह्त्वाचा खेळाडू ठरला. या विजयासह राजस्थानचा आयपीयलमधला प्रवास संपला आहे.
RR beat CSK, RR Won by 6 Wickets: आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 62 वा सामना काल खेळण्यात आला. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings vs Rajasthan Royals) यांच्यात हा सामना झाला. या सामन्यात राजस्थानने चेन्नईवर 6 विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईने राजस्थानला 188 धावांचं आव्हान दिलं होतं. जे आव्हान राजस्थानने17 बॉलआधी 4 विकेटसच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. राजस्थानच्या विजयाचा मुख्य नायक ठरला तो म्हणजे वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi,). वैभव सूर्यवंशी याने झंजावाती अर्धशतक पूर्ण ठोकलं. 57 धावा करत संघात सर्वाधिक धावा त्याने केल्या.
वैभव सूर्यवंशीने 33 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने सर्वाधिक 57 रन्स केल्या. राजस्थानचा हा शेवटचा सामना होता. मात्र, त्या सामन्यात वैभवने त्याच आयपीएल कारकीर्दीतील पहिल अर्धशतक झळकावल. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन याने 31 बॉलमध्ये 41 रन्स केल्या, ज्यात 2 सिक्स आणि 3 फोरचा समावेश आहे. राजस्थानचा ओपनर यशस्वी जयस्वालने 19 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या जोरावर 36 धावा केल्या. रियान पराग मात्र,फ्लॉफ ठरला त्याने अवघ्या 3 धावा केल्या.
तर, चेन्नई सुपर किंग्जमध्ये कोणताही मोठा फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात यशस्वी ठरला नाही. शिवम दुबे याने 32 चेंडूत अवघ्या 39 धावा केल्या. ज्यात 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर कर्णधार धोनी याने 16 धावा केल्या. आर अश्विन याने 13 तर डेव्हॉन कॉनव्हेने 10 धावा केल्या. तसेच अंशुल कंबोज याने 5 आणि नूर अहमद 2 धावा करुन नाबाद परतले. राजस्थानसाठी युद्धवीर सिंह आणि आकाश मढवाल या दोघांनी प्रत्येकी आणि सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)