विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

RCB vs MI, IPL 2019: इंडियन प्रमीमियर लीग (Indian Premier League 2019) अर्थातच आयपीएल 2019 (IPL 2019) च्या 12 व्या पर्वातील सातव्या सामन्यामुळे बंगळुरु येथील एम चन्नास्वामी स्टेडियम (M Chinnaswamy Stadium in Bengaluru) आज क्रिकेट प्रेमींभरुन गेले आहे. या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) असा सामना आज (28 मार्च 2019) या स्टेडीयमवर खेळला जात आहे. नाफेक झाली असून सामन्याला सुरुवात झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)  याने जिंकली नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहित शर्मा  (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाबाबत बोलायचे तर, अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा याचे पुन्हा एकदा मुंबई संघात पुनरागमन झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे श्रीलंका क्रिकेट (एसएलसी)ने आगोदरच स्पष्ट केले आहे की, जर विश्वचषक खेळायचा असेल तर, श्रीलंकेच्या खेळाडूंनी देशातील प्रादेशिक संघांमधून खेळले पाहिजे. श्रीलंका क्रिकेट प्रशासनाच्या निर्णयानंतर मलिंगा याने मुंबईच्या सुरुवातीच्या सहा सामन्यांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे आग्रह धरलाहोता की, त्यांनी मलिंगा याला शक्य तितके आयपीएल सामने खेळण्याची संधी द्यावी. बीसीसीआयच्या सूचनेचा आदर करत श्रीलंका क्रिकेटने ही मुभा दिली.

एकदिवसीय सामन्यातील सर्वश्रेष्ट फलंदाज विराट कोहली आणि सर्वश्रेष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल सामन्यांमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या दोघांवर नजर नाही टिकली तरच नवल. दुखापतीचा यशस्वी सामना केलेला जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा आपला जलवा दाखवण्यासाठी मैदानावर उपस्थित आहे. बुमराह याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई संघ काहीसा चिंतेत होता.

पराभवाचे उट्टे काढत संघाने नवी लय आत्मसात करावी यासाठी रोहित शर्मा प्रयत्नशील असेल यात शंका नाही. गेल्या सामन्यावेळी युवराज सिंह याने 53 धावांची खेळी केली होती. मात्र, संघातील इतर खेळाडंची कामगीरी तितकी म्हणावी अशी झाली नव्हती. दुसऱ्या बाजूला बंगळुरुच्या संघालाही नामुष्कीजनक पराभावाचा सामना करावा लागला होता. चेन्नई सुपर किंग्ज संगाविरुद्ध आपल्या पहिल्याच सामन्यात बंगळुरुचा संघ 70 धावांनी पराभूत झाला होता. (हेही वाचा, आम्रपाली ग्रुप विरोधात 'कॅप्टन कूल'ची सर्वोच्च न्यायालयात धाव, 40 कोटी थकवल्याचा आरोप)

मुंबई इंडियंस : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, बेन कटिंग, मिशेल मॅकलेनगन, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, रसिख सलाम, युवराज सिंह, सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डि कॉक (विकेटकीपर)

रॉयल चैलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डि विलियर्स, कॉलिन डी ग्रँडहोम, मोहम्मद सिराज, पार्थिव पटेल, नवदीप सैनी, टिम साउथी, युजवेंद्र चहल,गुरकीरत सिंह मान , शिवम दुबे, शिमरोन हेटमेयर