Rohit Sharma Milestone: रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार जगातील पहिला कर्णधार

रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करेल, तर सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करेल. रोहित शर्मा 2 ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील पहिला वनडे सामना खेळणार आहे. तो या सामन्यातच एक नवा विक्रम करू शकतो.

Rohit Sharma (Phto Crdit - X)

मुंबई: भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट मालिका (IND vs SL Series) 27 जुलैपासून सुरू होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) या मालिकेत इतिहास रचू शकतो. टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करेल, तर सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करेल. रोहित शर्मा 2 ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील पहिला वनडे सामना खेळणार आहे. तो या सामन्यातच एक नवा विक्रम करू शकतो. या सामन्यात रोहित शर्माने 3 षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल. (हे देखील वाचा: T20 Captains of India: सूर्यकुमार यादव भारताचा 13 वा कर्णधार, आतापर्यंत 'या' खेळाडूंनी केले आहे टी-20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व)

ठरणार जगातील पहिला कर्णधार

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आतापर्यंत एकूण 231 षटकार ठोकले आहेत, तर या बाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन पहिल्या क्रमांकावर आहे. इऑन मॉर्गनने कर्णधार म्हणून एकूण 233 षटकार मारले आहेत. म्हणजेच 3 षटकार मारल्यानंतर रोहित शर्मा इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनचा विक्रम मोडेल. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून 211 षटकार ठोकले आहेत. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे, ज्याने कर्णधार म्हणून 171 षटकार ठोकले आहेत.

खेळाडू संध षटकारांची संख्या (कर्णधार म्हणून)
इओइन मॉर्गन  इंग्लंड 233
रोहित शर्मा भारत 231
महेंद्र सिंह धोनी भारत 211
रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलिया 171
बँडम मॅक्युलम न्युझीलँड 170
विराट कोहली भारत 138

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यांचे वेळापत्रक

तारीख  मैच  वेळ
 27 जुलै  पहिला टी-20  संध्याकाळी 7 वाजता
 28 जुलै  दुसरा टी-20  संध्याकाळी 7 वाजता
 30 जुलै  तिसरा टी-20  संध्याकाळी 7 वाजता
 2 ऑगस्ट  पहिला वनडे  दुपारी 2:30 वाजता
 4 ऑगस्ट  दुसरा वनडे  दुपारी 2:30 वाजता
 7 ऑगस्ट  तिसरा वनडे  दुपारी 2:30 वाजता