Rohit Sharma on Shikhar Dhawan Retirement: "...द अल्टीमेट जाट" रोहित शर्माची शिखर धवनच्या निवृत्तीवर भावुक पोस्ट
ज्यात त्याला मिळालेल्या सर्वांचे सकार्य आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
स्टार फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) 24 ऑगस्ट रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. टीम इंडियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma ) शिखर धवनच्या निवृत्तीबाबत पोस्टमध्ये दोघांचे एकापेक्षा एक कमाल फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनही आकर्षक दिले आहे. (हेही वाचा - Shikhar Dhawan Retirement: शिखर धवन याची आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा)
पाहा पोस्ट -
रोहित शर्माने शिखरचे पूर्वीपासूनचे काही फोटो पोस्ट शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रूम शेअर करण्यापासून ते मैदानावरील आयुष्यभराच्या आठवणी शेअर करण्यापर्यंत. तू नेहमीच दुसऱ्या टोकाला राहून माझं काम सोपं केलं आहेस. द अल्टीमेट जाट.’
धवन व रोहितच्या जोडीने इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ते दुबईतील आशिया चषकापर्यंत वेगवेगळ्या परिस्थितीत चांगली कामगिरी केली. वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर आणि प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध जुळवून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे भारतीय संघासाठी एक विश्वसनीय सलामीची जोडी बनली.
एका दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट टीम मधील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व असलेल्या शिखर धवन याने, एक्स पोस्टच्या माध्यमातून भावनिक व्हिडिओ संदेश जारी केला. ज्यात त्याला मिळालेल्या सर्वांचे सकार्य आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण प्रवासात अतुट पाठिंबा दिल्याबद्दल त्याने त्याचे कुटुंब, बालपणीचे प्रशिक्षक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) यांचे आभार मानले.