T20 World Cup 2024: रोहित शर्माने अजित आगरकरची घेतली भेट, हार्दिक पांड्याच्या टी-20 विश्वचषकासाठी निवड करण्याबाबत झाली महत्त्वाची चर्चा
चाहत्यांच्या नजरा आता टीम इंडियाच्या संघावर खिळल्या आहेत.
T20 World Cup 2024: बीसीसआय (BCCI) लवकरच आगामी टी-20 विश्वचषक 2024 साठी (T20 World Cup 2024) टीम इंडियाची (Team India) घोषणा करू शकते. चाहत्यांच्या नजरा आता टीम इंडियाच्या संघावर खिळल्या आहेत. दुसरीकडे, बीसीसीआयच्या निवडकर्त्यांची नजर आयपीएल 2024 वर आहे. या मोसमात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते. मिळालेल्या वृत्तानुसार, नुकतेच टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि बीसीसीआयच्या निवडकांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) भेट घेतली आहे. बराच वेळ चाललेल्या या बैठकीत हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) टी-20 विश्वचषकातील पुनरागमनावर चर्चा झाली.
हार्दिकची खराब कामगिरी, वर्ल्डकपमध्ये कसं करणार पुनरागमन?
वास्तविक, हार्दिक पांड्याची आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत अत्यंत खराब कामगिरी झाली आहे, पांड्याने फलंदाजीत नक्कीच चांगली कामगिरी केली असली तरी आता त्याची गोलंदाजी संघासाठी चिंतेचा विषय बनली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत हार्दिकला आता आयपीएल 2024 मध्ये नियमितपणे गोलंदाजी करावी लागेल, असा निर्णय घेण्यात आला. टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत हार्दिक पांड्याचे पुनरागमन आता त्याच्या गोलंदाजीवर अवलंबून असेल. (हे देखील वाचा: Orange Purple Cap: रोहित शर्माने ऑरेंज कॅपला दिली कडवी टक्कर, तर, युजवेंद्र चहलच्या नावावर सर्वाधिक विकेट्स)
हार्दिकची गोलंदांजीत अत्यंत खराब कामगिरी
वास्तविक, दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिकने आयपीएल 2024 मध्ये थेट पुनरागमन केले आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 सामन्यांमध्ये हार्दिकने गोलंदाजी केली आहे. या काळात हार्दिकची गोलंदाजीतील कामगिरी अत्यंत खराब होती. हार्दिक प्रत्येक सामन्यात चांगलाच महागडा ठरला आहे. सीएसके विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने 3 षटकात 2 बळी घेत 43 धावा दिल्या. त्यापैकी 26 धावा पांड्याने शेवटच्या षटकात केल्या. या मोसमात आतापर्यंत पांड्याने 12 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत आणि त्याला फक्त तीन विकेट मिळाल्या आहेत. दुखापत होण्याआधी हार्दिक गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करत होता पण आता त्याची चमकदार लय दिसत नसल्याने टीम इंडियाचा तणाव थोडा वाढताना दिसत आहे.