तिला बाहुपाशात घेऊन ऋषभ पंत म्हणाला 'मैं तुम्हें खुश रखना चाहता हूं'
फोटोमध्ये ऋषभ आणि त्याच्या बाहुपाशातली ती मुलगी असे दोघेही भलतेच खूश दिसत आहे. मात्र, 'मैं तुम्हें खुश रखना चाहता हूं' या संदेशाशिवाय त्या मुलीबद्दल ऋषभने काहीच लिहिली नाही. दरम्यान, ही मुलगी ऋषभ गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे.
टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावरुन भारतात परतला आहे. टी-20 आणि टेस्ट सीरिजसाठी (Test Series) त्याची निवड करण्यात आली होती. दरम्यान, ऑस्ट्रेलियात विरुद्ध खेळल्या जात असलेल्याआणि न्यूजीलँड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे सीरिजसाठी महेंद्र सिंह धोनीची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ऋषभ पंत याला सध्या विश्रांती देण्यात आली आहे. मायदेशी परतलेल्या ऋषभ सध्या सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव पाहायला मिळतोय. नुकतेच त्याने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने एक सुंदर मेसेजही पोस्ट केले आहे. ऋषभने पोस्ट केलेल्या फोटोतील मुलगी त्याची इशा नागी (Isha Negi)असून, ती त्याची गर्लफ्रेंड (Girlfriend)असल्याची चर्चा आहे.
फोटोमध्ये ऋषभने एका मुलीला आपल्या बाहुपाशात घेतलेले पाहायला मिळते. तसेच, फोटोखाली त्याने 'मैं तुम्हें खुश रखना चाहता हूं' असा संदेशही लिहिला आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ऋषभने हा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ऋषभ आणि त्याच्या बाहुपाशातली ती मुलगी असे दोघेही भलतेच खूश दिसत आहे. मात्र, 'मैं तुम्हें खुश रखना चाहता हूं' या संदेशाशिवाय त्या मुलीबद्दल ऋषभने काहीच लिहिली नाही. दरम्यान, ही मुलगी ऋषभ गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे. या फोटोवरुन त्याचे चाहते भलतेच अंदाज लावत आहेत. ऋषभने मात्र इन्स्टाग्रामवर या मुलीबद्दल काहीच लिहिले नाही. (हेही वाचा, VIDEO: कोहली चाचू... चिमुकल्या फॅनची हाक ऐकून विराटने दिली रिअॅक्शन , व्हिडिओ व्हायरल)
View this post on Instagram
I just want to make you happy because you are the reason I am so happy
A post shared by Rishabh Pant (@rishabpant) on
दरम्यान, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते एम एस के प्रसाद यांना वाटते की ऋषभ पंत चँपियन क्रिकेटर बनण्याच्या दिशेने योग्य पावले टाकत आहे. ऋषभ पंत याने ऑस्ट्रेलियामध्ये तीन टी-20 आणि चार टेस्ट सामने खेळले. सलग खेळाचा त्याच्या शरीरावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याला आरामाची गरज आहे. त्याला नक्कीच विश्रांती दिली जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)