IPL च्या इतिहासात सर्वाधिक ‘या’ संघाने केली शतके, CSK 5 व्या तर KKR शेवटच्या स्थानी
आतापर्यंतच्या संपूर्ण आयपीएल हंगामावर नजर टाकली तर सर्वाधिक शतके करणारा संघ विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आहे. या संघाकडून खेळाडूंनी जास्तीत जास्त 14 शतके केली आहेत. आयपीएलच्या 14 व्या हंगामात एकूण तीन खेळाडूंनी शतके केली आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या हंगामातील उर्वरित सामने काही दिवसात सुरु होणार आहेत. स्पर्धेचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान यूएईच्या मैदानावर खेळले जाणार आहेत. ही मालिका मार्चमध्ये दणक्याने भारतात सुरु झाली, परंतु खेळाडूंना बायो बबलमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे स्पर्धा मध्यावर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलच्या (IPL) 14 व्या हंगामात एकूण तीन खेळाडूंनी शतके केली आहेत. ज्यात पहिले शतक राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनने ठोकले होते. यानंतर याच संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने देखील हंगामात शतक झळकावले. तिसरे शतक रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) सलामीवीर देवदत्त पडिकलने केले. सर्वात मोठी खेळी बटलरने खेळली, ज्याने सर्वाधिक 124 धावा केल्या, तर सॅमसन 119 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (IPL 2021: दिल्लीचा फिरकीपटू सिद्धार्थ मणिमरण दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर, त्याच्या जागी 'या' खेळाडूची लागली वर्णी)
आयपीएलच्या इतिहासात शतक ठोकणारा संघ
आतापर्यंतच्या संपूर्ण आयपीएल हंगामावर नजर टाकली तर सर्वाधिक शतके करणारा संघ विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आहे. या संघाकडून खेळाडूंनी जास्तीत जास्त 14 शतके केली आहेत. स्पर्धेत शतक करणाऱ्या यादीत पंजाब किंग्जचे नाव देखील येते. RCB पेक्षा 1 कमी म्हणजे 13 शतके या संघाने केली आहेत. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. या संघाच्या फलंदाजांनी एकूण 10 शतके केली आहेत. तसेच, राजस्थान रॉयल्स संघ या प्रकरणात 9 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्स 8 शतकांसह पाचव्या क्रमांकावर आहे. चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाकडून फलंदाजांनी फक्त 4 शतके झळकावली आहेत आणि या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. 3 शतकांसह सनरायझर्स हैदराबाद यादीत सातवा आणि फक्त 1 शतकासह कोलकाता नाईट रायडर्स संघ आठव्या स्थानावर आहे.
आयपीएल 2021 चा पहिला टप्पा काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुढे ढकलण्यात आला. आयपीएल 2021 भारतात एप्रिलमध्येच सुरु झाला होता परंतु खेळाडूंना संसर्ग झाल्यानंतर ते पुढे ढकलण्यात आले. आता 19 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा स्पर्धा सुरु होणार आहे. आयपीएल 2021 चा दुसऱ्या टप्पा यूएईमध्ये खेळला जाणारा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. लीगचा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.