Fans Pray for RCB’s Victory in IPL 2025 Final: कर्नाटकमध्ये आरसीबी चाहत्यांचे मंदिरात हवन, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा खास शुभेच्छा (Video)

आज आपीएल फायनलचा थरार पहायला मिळणार आहे. दोन्ही फायनलिस्ट संघाचे चाहते आपापल्या संघाच्या विजयासाठी मंदिरात प्रार्थना करताना दिसत आहेत.

Fans Pray for RCB’s Victory in IPL 2025 Final: कर्नाटकमध्ये आरसीबी चाहत्यांचे मंदिरात हवन, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा खास शुभेच्छा (Video)
PC-X

Fans Pray for RCB’s Victory Over PBKS in IPL 2025 Final: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज इलेव्हन संघ (RCB vs PBKS) आयपीएल 2025 च्या अंतिम ( IPL Final 2025) सामन्यासाठी एकमेकांसमोर येणार आहेत. कर्नाटकमध्ये दोन्ही संघांचे चाहते विशेषतः आरसीबी संघ आणि विराटचे (Virat Kohli) कट्टर चाहते, त्यांच्या संघाच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. राज्यभरातील चाहते मंदिरांमध्ये गर्दी करत आहेत आणि विशेष पूजा करत आहेत. त्यांच्या संघाच्या विजयासाठी या प्रार्थना होत आहेत.

हुबळी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक सिद्धरुद्ध मठ, बदामी येथील बनशंकरी मंदिर आणि कोप्पल जिल्ह्यातील अंजनाद्री मंदिरातही चाहते जमले होते. अंजनाद्री हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. आरसीबी संघाच्या समर्थकांनी खेळाडू आणि संघाचे पोस्टर्स प्रदर्शित केले आणि त्यांच्या संघाच्या विजयाच्या मार्गातील कोणतेही अडथळे दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यासाठी विशेष पूजा केली.

Vijayapura, Karnataka: Fans performed a special Homa at the Yoga Nandeeshwara Temple for RCB’s victory pic.twitter.com/ZGqb3gEJPZ

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या प्रसंगी आरसीबी संघाची जर्सी घालून 55 सेकंदांचा एक व्हिडिओ जारी केला. ज्यात शिवकुमार म्हणाले, "गेल्या 18 वर्षांपासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो. अठरा वर्षांनंतर प्रचंड उत्साह आणि अढळ समर्पणाचा क्षण आला आहे. आमची रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू फायनलसाठी मैदानात उतरले आहे."

 

शिवकुमार म्हणाले, "गेल्या 18 वर्षांपासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो. अठरा वर्षांनंतर प्रचंड उत्साह आणि अढळ समर्पणाचा क्षण आला आहे. आमची रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू फायनलसाठी मैदानात उतरले आहे. संपूर्ण राज्य अभिमानाने आणि विश्वासाने तुमच्या पाठीशी उभे आहे. ही फक्त एक जर्सी नाही, ती लाखो लोकांची स्वप्ने आहेत. आम्ही तुमच्यासोबत आहोत, कर्नाटक तुमच्यासोबत आहे. ट्रॉफी घरी घेऊन या. कर्नाटक तुमच्यासोबत उभा आहे," असे शिवकुमार यांनी म्हटले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 03:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).