डेविड वॉर्नरला बॅटने स्वतः सारखी तलवारबाजी करताना पाहून रवींद्र जडेजा ने दिली अशी प्रतिक्रिया, पाहा Video

वॉर्नरच्या व्हिडिओवर जडेजाने प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की,"जवळजवळ डेविड."

डेविड वॉर्नर (Photo Credits: Instagram)

ऑस्ट्रेलियन संघाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडला गेला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार्‍या वॉर्नरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर नुकताच शेअर केला आहे. तथापि, हा व्हिडिओ मागील वर्षीच्या एका शूट केलेल्या जाहिरातीचा आहे जिथे वॉर्नर तलवारीप्रमाणे बॅट फिरवत आहे. दिग्दर्शक कट बोलताच वॉर्नरला त्याचे हसू अनावर होते. आयपीएल 2020 देखील कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. अशा स्थितीत सर्व क्रिकेटपटू घरात राहून आपले आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहे आणि सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहेत. या दरम्यान वॉर्नरनेही व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या फलंदाजीद्वारे सेलिब्रेशनमध्ये केलेल्या फेंसिंगची कॉपी करताना दिसला आहे. वॉर्नरने व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांना फलंदाजीद्वारे जडेजाच्या 'तलवारबाजीच्या' सेलिब्रेशनचे अनुकरण करू शकलो की नाही? अशी प्रतिक्रियाही विचारली.

वॉर्नरच्या व्हिडिओवर जडेजाने प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की,"जवळजवळ डेविड." अलीकडे, जेव्हा ऑस्ट्रेलिया दौरा भारत दौर्‍यावर वनडे मालिका खेळायला आला तेव्हा वॉर्नर जबरदस्त फॉर्ममध्ये होता. वानखेडे येथे खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात त्याने 128 धावांची शानदार खेळी केली होती. पहिला सामन्यात पराभव झाल्यावरही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला.

आयपीएलमध्ये वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद संघाकडून (सनरायझर्स हैदराबाद) खेळत आहे. नुकतंच स्पर्धा सुरु होण्यापूर्वी त्याला पुन्हा एकदा संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने 2016 चे आयपीएल विजेतेपद जिंकले होते. 2018 मध्ये वॉर्नरवर बॉल टॅम्परिंगच्या आरोपा खाली बंदी घालण्यात आली होती, ज्यामुळे तो आयपीएल खेळू शकला नाही.नव्हता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif