Sanjay Manjrekar यांनी फ्री-हिट हटवण्याचा दिला सल्ला तर Ravichandran Ashwin ने गोलंदाजांसाठी केली विशेष मागणी (See Tweet)
भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर म्हणतात की फ्रि हिटचा नियम क्रिकेटमधून काढून टाकला पाहिजे कारण तो गोलंदाजांसाठी योग्य नाही. त्यांनी ट्विटरवर नियमांमधील बदलाबाबत आपले विचार पोस्ट केले आणि यूजर्सकडून सल्ला मागितला. त्यांच्या या ट्विटवर भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने एक मजेदार प्रतिक्रिया दिली आणि गोलंदाजांसाठी विशेष नियमाची मागणी केली.
गेल्या दशकात मर्यादित ओव्हर क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. विशेषत: टी-20 क्रिकेटच्या सुरुवातीबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) खेळ लोकप्रिय करण्यासाठी अनेक नियम बदलले आहेत. तथापि, त्याचा फायदा गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना अधिक झाला आहे. यावरही बर्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांचेही तेच मत आहे. त्यांनी नुकतंच क्रिकेटच्या नियमात बदल करून 'फ्री हिट' आणि 'लेग बाय' काढून टाकण्याची मागणी केली आहे. मांजरेकर म्हणतात की फ्रि हिटचा नियम क्रिकेटमधून काढून टाकला पाहिजे कारण तो गोलंदाजांसाठी योग्य नाही. त्यांनी ट्विटरवर नियमांमधील बदलाबाबत आपले विचार पोस्ट केले आणि यूजर्सकडून सल्ला मागितला. त्यांच्या या ट्विटवर भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) एक मजेदार प्रतिक्रिया दिली आणि गोलंदाजांसाठी विशेष नियमाची मागणी केली. (IPL दरम्यान कुटुंबीय COVID-19 शी संघर्ष करताना Ravichandran Ashwin ची उडाली होती झोप, भारतीय फिरकीपटूने सांगितला भयानक अनुभव!)
मांजरेकर यांनी हिंदुस्तान टाईम्समधील आपल्या लेखात लिहिले होते की मला फ्री हिटचा नियम काढायचा आहे, गोलंदाजांसाठी ते चुकीचे आहे. मांजरेकर यांनी पुढे लिहिलं आहे की या नियमांमुळे गोलंदाजाला अतिरिक्त चेंडू टाकणे भाग पडते. याव्यतिरिक्त, फलंदाजीच्या खात्यात अतिरिक्त धावा देखील जोडल्या जातात. शिवाय पुढच्याच चेंडूवर फलंदाजाला फटका फुकट मिळतो, ज्यामध्ये तो आऊट होऊ शकत नाही. अश्विन यांनी लिहिले की, “संजय मांजरेकर हे फ्री हिट मार्केटींगचे उत्तम शस्त्र आहे आणि याने सर्व चाहत्यांची मने एक प्रकारे टिपली आहेत.अशा परिस्थितीत गोलंदाजांसाठी 'फ्री बॉल' चा नियम जोडला गेला पाहिजे, जेव्हा एखादा फलंदाज बॉल फेकण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर लवकर सोडतो तेव्हा त्या चेंडूवर विकेट मिळाल्यास गोलंदाजाने एकूण धावा दिल्या. त्यातून 10 धावा कमी केल्या पाहिजेत.”
दुसरीकडे, अश्विनने मंकडींगचे समर्थन केले. तो पुढे म्हणाले की, लक्षात ठेवा जेव्हा चेंडू गोलंदाजीच्या हातातून बाहेर पडतो तेव्हाच तुम्ही क्रीज सोडली पाहिजे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्ज (तत्कालीन किंग्ज इलेव्हन पंजाब) कडून खेळताना अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला एका सामन्यात मंकडींग बाद केले, ज्यामुळे त्याला बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या भूमीवर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल रंगणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर अश्विनच्या धारदार गोलंदाजी आणि फलंदाजीकडे असेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)