Ravichandran Ashwin: घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची नेहमीच एक विशेष भावना; शतकानंतर अश्विनने दिली प्रतिक्रीया

या शतकानंतर अश्विनने आपली प्रतिक्रीया दिली आहे.

R Ashwin (Photo credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे.  अष्ट्रपेलु खेळाडू आर अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले आहे. या शतकानंतर अश्विनने आपली प्रतिक्रीया दिली आहे. "घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची नेहमीच एक विशेष भावना असते. हे असे मैदान आहे ज्यात मला क्रिकेट खेळायला खूप आवडते. याने मला खूप छान आठवणी दिल्या आहेत. मी टी -20 स्पर्धेच्या (टीएनपीएल) मागे परतलो आहे, माझ्या फलंदाजीवर खूप काम केले आहे. अर्थात, मी नेहमीच माझी बॅट ऑफ-स्टंपच्या बाहेर फिरवत असतो असे त्यांने म्हटले आहे. " (हेही वाचा - Ravichandran Ashwin Century: आर अश्विनने कसोटी कारकिर्दीतील झळकावले सहावे शतक, टीम इंडियाची सामन्यात मजबूत पकड)

पाहा पोस्ट -

यावेळी अश्विनने रविंद्र जाडेजाचे देखील कौतृक केले आहे.  "जद्दू आमच्या संघासाठी सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो तिथे आहे, तो खूप मजबूत आहे आणि तो मला सांगण्यासाठी खूप उपयुक्त होता की आपल्याला दोनचे तीनमध्ये रूपांतर करण्याची गरज नाही जे माझ्यासाठी खरोखर उपयुक्त होते.ही एक सामान्य, जुन्या पद्धतीची चेन्नईची खेळपट्टी आहे जिथे ओव्हरस्पिनला थोडासा उसळी मिळेल.  उद्या नव्याने सुरुवात करावी लागेल. खेळपट्टीमध्ये थोडेसे आहे, ते अजूनही खाली ओलसर आहे, म्हणून आशा आहे की ते कोरडे झाल्यावर ते लवकर वाढेल."