Ranji Trophy: मुंबईच्या 10-11 व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी शतक ठोकत रचला इतिहास
यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचवेळी अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तुषार देशपांडेने 129 चेंडूत 123 धावा केल्या.
रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy 2023-24) उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई आणि बडोदा संघ (Mumbai vs Baroda) आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबईच्या खेळाडूंकडून ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. मुंबईचे अष्टपैलू तनुष कोटियन (Tanush Kotian)आणि तुषार देशपांडे (Tushar Deshpande) यांनी बडोद्याविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत इतिहास रचला. दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर खेळताना दोघांनी एकाच डावात शतके झळकावली. या क्रमांकावर फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज एकाच डावात शतके ठोकणारी प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी जोडी ठरली. (हेही वाचा - Musheer Khan Double Century: सरफराज खानचा छोटा भाऊ मुशीरने बडोद्याविरुद्ध रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीत झळकावले पहिले द्विशतक)
पाहा पोस्ट -
1946 नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर असलेल्या फलंदाजांनी एकाच डावात शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यावेळी चंदू सरवटे आणि शुटे बॅनर्जी यांनी इंग्लंड दौऱ्यात टूर मॅचमध्ये ही कामगिरी केली होती. या डावात दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या तनुष कोटियनने 129 चेंडूत नाबाद 120 धावा केल्या. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचवेळी अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तुषार देशपांडेने 129 चेंडूत 123 धावा केल्या. यादरम्यान तुषार देशपांडेने 10 चौकार आणि 8 षटकार मारले.
या सामन्याच्या पहिल्या डावात मुशीर खानने मुंबईसाठी द्विशतक झळकावले होते. मुशीर खानने 357 चेंडूत 203 धावा करत संघाची धावसंख्या 384 पर्यंत नेली. प्रत्युत्तरात बडोदा संघाला पहिल्या डावात केवळ 348 धावा करता आल्या.