R Ashwin Breaks Anil Kumble's Record: कानपूर कसोटीत आर अश्विनने रचला इतिहास, यावेळी कुंबळेचा 'हा' मोठा विक्रम मोडला

अश्विन आता आशियामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.

R Ashwin (Photo Credit - X)

IND vs BAN 2nd Test 2024: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs BAN 2nd Test 2024) कानपूरमध्ये (Kanpur) सुरू आहे. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर आर अश्विनने (Ravichandra Ashwin) बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतोची विकेट घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अश्विन आता आशियामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. या प्रकरणात त्याने दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test 2024: नाणेफेक होताच 9 वर्ष जुना विक्रम मोडला, भारताने पहिल्यांदाच केली 'अशी' कामगिरी)

कुंबळेचा हा मोठा विक्रम मोडला (R Ashwin Breaks Anil Kumble's Record)

आर अश्विन त्याच्या कारकिर्दीतील 102 वा सामना खेळत आहे. त्याने भारताकडून आतापर्यंत 522 विकेट घेतल्या आहेत. कानपूरमध्ये नजमुल हसन शांतोला बाद करून त्याने आशियातील खेळपट्ट्यांवर 420 बळी पूर्ण केले. याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता, ज्याने आशियामध्ये 419 विकेट्स घेतल्या होत्या, मात्र आता अश्विन त्याच्या पुढे गेला आहे.

आशियातील सर्वाधिक कसोटी बळी (Most Wickets in Asia in Tests)

612 एम मुरलीधरन

420 आर अश्विन*

419 अनिल कुंबळे

354 रंगना हेरथ

300 हरभजन सिंग

मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर 

आशियामध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत, श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक 800 बळी घेतले. यातील त्याने आशियातील खेळपट्ट्यांवर 612 धावा ठोकल्या होत्या. या यादीत आर अश्विन आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. अश्विनच्या नावावर 420 विकेट्स आहेत.