PSL 2020: लाईव्ह सामन्यात जेसन रॉय याने वहाब रियाज वर लगावला बॉल टेंपरिंग चा आरोप, पीएसएलमध्ये झाला नवीन वाद

यानंतर पीएसएलमध्ये नवा वाद निर्माण झाला. गुरुवारी ही घटना घडल्याचे सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले. क्वेटा ग्लेडिएटर्सचा कर्णधार सरफराज अहमद यांनीही या वादाची पुष्टी केली आहे.

वहाब रियाज, जेसन रॉय (Photo Credit: IANS)

इंग्लंडचा सलामी फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) ने पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) मधील सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज वहाब रियाज (Wahab Riaz) वर बॉल टेम्परिंगचा (Ball Tampering) आरोप केला आहे. यानंतर पीएसएल (PSL) मध्ये नवा वाद निर्माण झाला. गुरुवारी ही घटना घडल्याचे सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले. क्वेटा ग्लेडिएटर्सचा (Quetta Gladiators) कर्णधार सरफराज अहमद यांनीही या वादाची पुष्टी केली आहे. रॉय पीएसएलमध्ये या संघाकडून खेळत आहे. अहमदच्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यात हे दोन्ही खेळाडू आपसात भिडले. पीएसएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फलंदाजी दरम्यान रॉयने वहाबला विचारले की त्याने रिव्हर्स स्विंग करण्यासाठी बॉल फिक्स केले का. यावर वहाब संतापला आणि मग दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्याने ग्लेडिएटर्सचा कर्णधार सरफराजने मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले. (असं फक्त पाकिस्तानमध्येच होऊ शतकं! PSL डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरल्याबद्दल कराची किंग्जचा अधिकारी झाला ट्रोल)

सामन्यानंतर क्वेटा संघाने आयोजक समितीकडे तक्रार केली. संघाने सांगितले की चेंडूची स्थिती बदलेली होती. परंतु समितीला सादर केलेल्या अहवालात त्यांनी कोणतेही नाव लिहिले नाही. या अहवालात पीसीबी आणि सामन्याच्या अधिकाऱ्यांना बॉलची स्थिती जाणून घेण्यास सांगितले आहे. जेणेकरून यापुढे असे होणार नाही. ग्लेडिएटर्सचा कर्णधार सरफराज म्हणाला की, त्याच्या संघाने नियमांचे पालन केले.परंतु या घटनेची अतिशयोक्ती होऊ नये असेही त्याने सांगितले. तो म्हणाला की जेव्हा जेव्हा खेळाडूंमध्ये कडक स्पर्धा असते तेव्हा या गोष्टी क्रिकेटमध्ये होतच असतात.

यापूर्वी पेशावर जल्मी आणि कराची किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यावेळी संघाशी संबंधित एक व्यक्ती डगआऊटमध्ये मोबाईल फोनवर बोलताना दिसला होता. पीएसएल, पाकिस्तानच्या देशांतर्गत खेळली जाणारी सर्वात मोठी टी-20 स्पर्धा आहे. अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू या लीगमध्ये सहभाग घेतात.