
Preity Zinta Income: अभिनेत्री प्रीती झिंटा लक्झरी जीवनशैली जगते. ती लाहोर 1947 चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रीतीची (Preity Zinta) टीम पंजाब किंग्ज आयपीएल 2025 (IPL 2025) च्या अंतिम फेरीतही पोहोचली आहे. प्रीती झिंटा आयपीएलपासून ते ब्रँड एंडोर्समेंटपर्यंत कोट्यावधींची कमाई करते. ज्यात तिच्याकडे करोडोंची गुंतणूक, मालमत्ता,तिचे कार कलेक्शन आज जाणून घेऊयात.
प्रीती झिंटाची एकूण संपत्ती किती आहे?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रीती झिंटाची एकूण संपत्ती 183 कोटी रुपये आहे. ती अभिनय, व्यवसाय सौदे आणि ब्रँड एंडोर्समेंटद्वारे कमाई करते. प्रीती एका ब्रँड एंडोर्समेंटमधून 1.5 कोटी रुपये घेते.
आयपीएलमध्ये गुंतवणूक
2008 मध्ये प्रीती झिंटा आयपीएल टीम पंजाब किंग्जची सह-मालक बनली. मनी कंट्रोलनुसार, प्रीतीने त्यावेळी 35 कोटींची गुंतवणूक केली होती, जी आता 350 कोटींपर्यंत वाढली आहे. 2008 मध्ये जेव्हा पंजाब किंग्जची सुरुवात झाली तेव्हा ती 76 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी करण्यात आली. 2022 पर्यंत त्याची किंमत 925 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढली.
आयपीएल टीम मालक अशा प्रकारे कमावतात
आयपीएलमधील तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या कमाईत आयपीएल टीमच्या मालकांचाही वाटा असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिकीट विक्रीचा 80 टक्के भाग संघ मालकांच्या खात्यात जातो. संघ प्रायोजकत्वाद्वारेही पैसे कमवतात.
प्रीती झिंटाच्या मालमत्ता
प्रीती झिंटा अनेक मालमत्तांच्या मालक आहेत. हाऊसिंग डॉट कॉमच्या वृत्तानुसार, प्रीती झिंटाचे मुंबईतील पाली हिल्स परिसरात 17.01 कोटी किमतीचे अपार्टमेंट आहे. तिचे मूळ गाव शिमला येथे एक घर देखील आहे. लग्नानंतर प्रीती लॉस एंजेलिसला शिफ्ट झाली. ती तिच्या पती जीन गुडइनफसोबत तिथे राहते. बेव्हरली हिल्समध्ये तिचे एक मोठे घर आहे.
प्रीती झिंटाचा कार कलेक्शन
प्रीती झिंटाला लक्झरी कारचीही आवड आहे. तिच्याकडे लेक्सस एलएक्स 400 क्रॉसओवर आहे. त्याची किंमत 12 लाख रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे पोर्श, मर्सिडीज बेंझ ई क्लास (58 लाख) आणि बीएमडब्ल्यू आहे.