Pulwama Terror Attack: विरेंद्र सेहवाग उचलणार शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षण खर्च

तरीही पुलवामा येथे शहीद झालेल्या CRPF जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सेहवाग स्कूलच्या माध्यमातू उचलण्याचा प्रस्ताव मी ठेवत आहे'.

Virender Sehwag | (Photo Credits: Twitter)

Pulwama Terror Attack: माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांना सामाजिक जबाबदारी ओळखून मोठं पाऊल उचलले आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांचा शिक्षणाच्या खर्च (Educational Expenses) विरेंद्र सेहवाग उचलणार आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विटर करत विरेंद्र सेहवाग यांने हा मनोदय व्यक्त केला. दरम्यान, शहिदांच्या कुटुंबियांना विविध स्थरातून मदत होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मदत केल्यानंतर आता विविध क्षेत्रातील दिग्गज लोकही शहीद कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढे येत आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही शहीदांच्या कुटुंबीयांना नुकतीच प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

विरेंद्र सेहवाग याने शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'शहीद जवानांसाठी आता आपण काहीही केले तरी, ते पुरेसे असणार नाही. तरीही पुलवामा येथे शहीद झालेल्या CRPF जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सेहवाग स्कूलच्या माध्यमातू उचलण्याचा प्रस्ताव मी ठेवत आहे'. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनीही या जवानांच्या कुटुंबियांना अर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीबद्दल यांच्याविषयी कौतुकाची भावना व्यक्त करण्यात येत आहे. (हेही वाचा, Pulwama Terror Attack: अमिताभ बच्चन यांच्याकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत)

सुट्टी संपवून कर्तव्यावर निघालेल्या जवानांच्या ताफ्यावर जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात चौदा फेब्रुवारी या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. या ताफ्यातील 70 वाहनांतून तब्बल २,५४७ जवान कर्तव्यावर निघाले होते. दरम्यान, हल्लेखोराने तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची धडक जवानांच्या ताफ्यातील वाहनाला दिली. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची भावना निर्माण झाली आहे.त्यानंतर बॉलिवुडसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि दिग्गज व्यक्तिमत्वांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.