PSL 2020 PlayOffs Squad: पाकिस्तान सुपर लीग 2020 प्लेऑफ सामन्यांसाठी संघांची घोषणा, फाफ डु प्लेसिस Peshawar Zalmi साठी करणार डेब्यू

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पाकिस्तान सुपर लीग प्ले ऑफची घोषणा केली आहे. उर्वरित दोन पीएसएल क्वालिफायर, एक एलिमिनेटर व फायनल कराची येथे होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिस या लीगमध्ये पदार्पण करणार आहे. डु प्लेसिस वगळता इतर 21 विदेशी खेळाडूंचीही उर्वरित चार सामने खेळण्यासाठी पुष्टी करण्यात आली आहे.

फाफ डु प्लेसिस (Photo Credits: Getty Images)

PSL 2020 PlayOffs Squad: पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) सहसा फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळली जाते. यंदा देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये (Pakistan) खेळली गेली होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे स्पर्धेचे प्ले ऑफ अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. फक्त, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पीएसएल प्ले ऑफची (PSL PlayOffs) घोषणा केली आहे. उर्वरित दोन पीएसएल क्वालिफायर, एक एलिमिनेटर व फायनल कराची येथे होणार आहेत. पहिला क्वालिफायर सामना आणि एलिमिनेटर सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. दुसरा क्वालिफायर 15 नोव्हेंबर रोजी होईल, तर पीएसएल (PSL) 2020चा अंतिम सामना 17 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) या लीगमध्ये पदार्पण करणार आहे. डु प्लेसिस वगळता इतर 21 विदेशी खेळाडूंचीही उर्वरित चार सामने खेळण्यासाठी पुष्टी करण्यात आली आहे.

सोमवारी, लीगने स्पर्धेच्या बाद फेरीत भाग घेणार्‍या चारही संघांच्या पूर्ण पथकांची घोषणा केली. 36 वर्षीय डु प्लेसिस पेशावर झल्मी संघात कीरोन पोलार्डची जागा घेईल. पोलार्ड वेस्ट इंडिजच्या न्यूझीलंड दौऱ्यावर असल्याने डु प्लेसिसची निवड करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त इंग्लंडचे 6 क्रिकेटपटूसुद्धा पीएसएल प्ले ऑफमध्ये खेळताना दिसतील. पीएसएलच्या प्ले ऑफच्या संघात इतर मोठ्या बदलांमध्ये तमीम इक्बाल आणि अबिद अली यांचा क्रिस लिन आणि सलमान बटच्या जागी लाहोर कलंदरमध्ये समावेश झाला आहे. क्रिस जॉर्डनच्या जागी शेरफेन रदरफोर्ड कराची किंग्जच्या संघात येणार आहे तर मुहम्मदुल्लाह मुलतान सुल्तान संघात मोईन अलीची जागा घेईल.

2017 नंतरडु प्लेसिस पहिल्यांदा पाकिस्तानला जाणार आहे. शिवाय, यंदा पहिल्यांदाच संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पीएसएलमध्ये खेळण्याबाबत डु प्लेसिसने म्हटले की, "पीएसएल 2020 च्या प्ले ऑफ स्टेजमध्ये मी पेशावर जल्मीमध्ये सामील होण्यास खूप उत्सुक आहे. 2017 मध्ये मी आयसीसी वर्ल्ड इलेव्हन दौर्‍यावर असताना पाकिस्तानमध्ये खेळण्याच्या माझ्या आठवणी आहेत आणि मला खात्री आहे की हा वेगळा अनुभव असेल. तथापि, कोविड-19 मुळे याला एक अविस्मरणीय क्षण म्हणून पाहिलं जाईल."

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now