PSL 2020 प्ले-ऑफच्या पेशावर आणि लाहोर मॅचदरम्यान पाकिस्तानी खेळाडूला आली ‘लघुशंका’, ऑन कॅमेरा खेळाडूंनी केलं ट्रोल; व्हिडिओ तुम्हालाही होईल हसू अनावर

पाकिस्तान सुपर लीगची (पीएसएल) 2020 आवृत्ती शनिवारी पुन्हा सुरू झाली. शावर विरुद्ध लाहोर या सामन्यादरम्यान पेशावरचा विकेटकीपर इमाम उल-हकने लाहोर संघाकडून खेळणाऱ्या मोहम्मद हाफीजला ऑन कॅमेरा ट्रोल केलं आणि म्हणाला की "तो मला मगाचपासून सांगत होता की मला सू करायला जायचं आहे."

(Photo Credit: Screengrab/Twitter

पाकिस्तान सुपर लीगची (Pakistan Super League) 2020 आवृत्ती शनिवारी पुन्हा सुरू झाली. मार्च महिन्यात लीग स्टेज संपल्यानंतर प्ले ऑफ खेळणे शिल्लक होते जेव्हा कोविडमुळे स्पर्धा घाईघाईने स्थगित करण्यात आली. तथापि, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) हंगामातील विजेता शोधण्यासाठी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संपुष्टात येताच अखेरचे चार सामने खेळण्याचा निर्णय घेतला. पेशावर (Peshawar Zalmi) विरुद्ध लाहोर (Lahore Qalandars) या सामन्यादरम्यान पेशावरचा विकेटकीपर इमाम उल-हकने (Imam-ul-Haq) लाहोर संघाकडून खेळणाऱ्या मोहम्मद हाफीजला (Mohammad Hafeez) ऑन कॅमेरा ट्रोल केलं. वहाब रियाझच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पेशावर संघाने 20 षटकांच्या अखेरीस 9 गड्यांच्या मोबदल्यात 170 धावांपर्यंत मजल मारली. अशाप्रकारे लाहोर संघाला 171 धावांचे टार्गेट मिळाले. संघाने 12व्या ओव्हरपर्यंत चांगली कामगिरी केली. या दरम्यान, मोहम्मद इरफानने बेन डंकला बाद केल्यानंतर मोहम्मद हाफीज ड्रेसिंग रुमच्या दिशेने धावताना दिसला. (PSL 2020: विचित्र हेल्मेट घालून शाहिद आफ्रिदी मैदानावर उतरला, 'धोकादायक' म्हणत यूजर्सने केला 'हा' सवाल See Pics)

सलामोचक रमीझ राजा यांनी टाईम आऊटमध्ये मैदानावर उभे राहून रणनिती आखत असलेल्या वहाब, शोएब मलिक आणि इमाम यांच्याशी गप्पा मारत कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चर्चेदरम्यान इमामने हाफिजला ट्रोल केले आणि म्हणाला की "तो मला मगाचपासून सांगत होता की मला सू करायला जायचं आहे." इमामच्या तोंडून हे वाक्य ऐकताच रमीज राजा आणि शोएब आणि वहाब यांना हसू अनावर झालं आणि जोरजोरात हसू लागले. पाहा हा व्हिडीओ:

दरम्यान, पीएसएलच्या नियमांनुसार क्वालिफायरमध्ये मुल्तान सुल्तान आणि कराची किंग्ज या पहिल्या दोन संघांचा सामना झाला. दोन्ही संघातील या सामन्यात कराची किंग्सना अखेरपर्यंत अनिर्णित राहिल्याने सुपर ओव्हरमध्ये कराची संघाने सामना जिंकला. दरम्यान, लाहोर कलंदर आणि पेशावर झल्मी यांच्यातील एलिमिनेटर सामन्यात लाहोर टीमने एक ओव्हर शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी लाहोर संघाचा सामना आज मुल्तान सुल्तान यांच्याशी होईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Durban Super Giants vs MI Cape Town SA20 2025 Live Streaming: डर्बन सुपर जायंट्स आणि एमआय केप टाउन यांच्यात होणार रोमांचक सामना, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

HBH vs SYS Qualifier BBL 2025 Dream11 Team Prediction: होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील सामन्यापूर्वी पिच रिपोर्ट, हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ जाणून घ्या

Hobart Hurricanes vs Sydney Sixers Qualifier BBL 2025 Live Streaming: होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात बिग बॅश लीग 2024-25 चा क्वालिफायर सामना, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

SEC vs DSG BBL 2024-25 Dream11 Team Prediction: आजचा सनरायझर्स ईस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात होणार लढत, येथे पहा हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम 11 संघ

Share Now