न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, पृथ्वी शॉ India A संघाच्या 2 सामन्यांच्या प्रॅक्टिस सामन्यातून बाहेर
टीमचा बॅकअप सलामी फलंदाज म्हणून निवड झालेला पृथ्वी शॉ जखमी झाला आहे. युवा सलामी फलंदाज पृथ्वीला दुखापतीमुळे न्यूझीलंड अ संघातून वगळण्यात आले आहे. रणजी करंडक स्पर्धेत खेळताना पृथ्वीला दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
न्यूझीलंडच्या (New Zealand) आगामी दौऱ्याआधी भारतीय संघाला (Indian Team) मोठा धक्का बसला आहे. टीमचा बॅकअप सलामी फलंदाज म्हणून निवड झालेला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) जखमी झाला आहे. युवा सलामी फलंदाज पृथ्वीला दुखापतीमुळे न्यूझीलंड अ संघातून वगळण्यात आले आहे. रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत खेळताना पृथ्वीला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. भारतीय संघाचा आतिशी युवा कसोटी सलामीवीर पृथ्वीला दुसर्या परदेश दौर्यापूर्वी दुखापत झाल्यामुळे बाहेर करण्यात आले आहे. पृथ्वी न्यूझीलंड दौर्यावरील दोन सराव सामन्यांमध्ये भारत-ए संघाकडून खेळणार नाही, शिवाय त्याला मालिकेमधून माघार घ्यावी लागली आहे. न्यूझीलंडमध्ये होणार्या वनडे आणि चार दिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या सहभागावर निर्णय नंतरच्या टप्प्यावर घेण्यात येईल," असे बीसीसीआयने निवेदनात म्हटले आहे. "टीम इंडियाचा फलंदाज पृथ्वी शॉला मुंबई आणि कर्नाटक रणजी करंडक सामन्याच्या पहिल्या (3 जानेवारी) फिल्डिंगच्या दरम्यान डाव्या खांद्यावर दुखापत झाली. पृथ्वीवर सध्या बेंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत (एनसीए) पुनर्वसन सुरू आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
मुंबईच्या रणजी करंडक सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डाव्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर शॉला एनसीएमध्ये दुखापतीच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले. शुक्रवारी ओव्हर थ्रो थांबविण्याच्या प्रयत्नात जखमी झालेला मुंबईचा युवा फलंदाज रणजी सामन्यात फलंदाजीसाठी किंवा मैदानात फिल्डिंगसाठी उतरला नाही आणि नंतर त्याला बेंगळुरूमध्ये पाठवण्यात आले. या दौर्यासाठी शॉच्या दोन भारत ए संघात स्थान देण्यात आले असून ही टीम 10 जानेवारीला न्यूझीलंडला रवाना होणार आहे.
पृथ्वीने वेस्ट इंडिजविरूद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पृथ्वीने आपल्या पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर ऑस्ट्रेलिया दौर्यावर सराव सामन्यादरम्यान पृथ्वी जखमी झाला आणि त्याला दौर्यावरुन परत यावं लागलं.