स्टार क्रिकेटर MS Dhoni यांची काश्मीर येथे पोस्टिंग; आर्मीच्या 106 व्या पॅराशूट बटालियनमध्ये होणार सामील

काश्मीरमध्ये तैनात असलेल्या टेरिटोरियल आर्मी (Territorial Army) च्या 106 व्या पॅराशूट बटालियनमध्ये सामील होणार आहे. आर्मीकडून सांगण्यात आले आहे की, लेफ्टिनेंट कर्नल (ऑनरेरी) एमएस धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 पर्यंत आपल्या बटालियनमध्ये काम करतील. सध्या बंगळूरू येथे त्यांचे ट्रेनिंग सुरु आहे.

स्टार क्रिकेटर MS Dhoni यांची काश्मीर येथे पोस्टिंग; आर्मीच्या 106 व्या पॅराशूट बटालियनमध्ये होणार सामील
MS Dhoni. File Image. (Photo Credits: Facebook)

इंडियन क्रिकेट टीम (Indian Cricket Team) चा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) लवकरच भारतीय सेना (Indian Army) शी जोडले जाणार आहेत. धोनी 31 जुलै रोजी काश्मीरमध्ये तैनात असलेल्या टेरिटोरियल आर्मी (Territorial Army) च्या 106 व्या पॅराशूट बटालियनमध्ये सामील होणार आहे. म्हणजेच प्रशिक्षणानंतर धोनी यांची काश्मीर येथे पोस्टिंग होणार आहे.आर्मीकडून सांगण्यात आले आहे की,  लेफ्टिनेंट कर्नल (ऑनरेरी) एमएस धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 पर्यंत आपल्या बटालियनमध्ये काम करतील. सध्या बंगळूरू येथे त्यांचे ट्रेनिंग सुरु आहे.

याआधी 2017 मध्ये धोनी जम्मू-काश्मीर येथील बारामुला येथे पार पडलेल्या आर्मीच्या संघटित क्रिकेट सामन्यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे ते पाहुणे होते. यावेळी त्यांनी या सामन्यात आर्मी चा युनिफॉर्मदेखील घातला होता. एमएस धोनी यांना 2011 मध्ये भारतीय टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टिनेंट कर्नलचा दर्जा देण्यात आला होता. (हेही वाचा: बेंगळुरूमध्ये MS Dhoni याची पॅराशूट रेजिमेंटसोबत ट्रेनिंगला सुरुवात, जाणून घ्या सविस्तर)

धोनी यांचे आर्मीप्रेम लपून राहिले नाही. महेंद्र सिंह धोनी यांनी टीम इंडियाला क्रिकेट विश्वात एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. मात्र रांचीच्या या मुलाला क्रिकेटर नाही तर काही दुसरेच काही व्हायचे होते. धोनी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होती की, लहानपणापासूनच त्यांना सैन्यात भरती व्हायचे होते. 2015 मध्ये धोनी यांनी स्पेशल फोर्ससोबत आपले ट्रेनिंग पूर्ण केले आहे. 2015 मध्ये त्यांनी विमानातून 5 उडी घेतली होती. यातील एक उडी तब्बल 1200 फुट उंचावरून घेतली होती. त्यावेळीही त्यांनी पॅराट्रूपर्स सोबत 12 दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jul 26, 2019 10:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).